भोपाळमध्ये प्री-वेडिंगवर बॅन, लग्न समारंभात आता कोरिओग्राफरला नो एण्ट्री

देशात सध्या लग्न समारंभात प्री-वेडिंग आणि संगीत कार्यक्रमाचे ट्रेण्ड वाढलेले दिसत आहे. पण या ट्रेण्डला मध्य प्रदेशातील भोपाळमधील अनेक समाजातून तसेच पंचायतीतून विरोध होत आहे.

भोपाळमध्ये प्री-वेडिंगवर बॅन, लग्न समारंभात आता कोरिओग्राफरला नो एण्ट्री

भोपाळ (मध्य प्रदेश) : देशात सध्या लग्न समारंभात प्री-वेडिंग आणि संगीत कार्यक्रमाचे ट्रेण्ड वाढलेले दिसत आहे. पण या ट्रेण्डला मध्य प्रदेशातील भोपाळमधील अनेक समाजातून तसेच पंचायतीतून विरोध होत आहे. लग्न समारंभात हे प्रकार बंद करण्याचा निर्णय (Pre wedding ban in bhopal) त्यांनी घेतला आहे.

भोपाळमधील जैन, गुजराती आणि सिंध समाजाने प्री-वेडिंग (Pre wedding ban in bhopal) शूट आणि लग्न समारंभात कोरिओग्राफर बोलवण्यावर बंदी आणली आहे. लग्न खर्चात वाढ होते. तसेच लोक लग्न खास बनवण्यासाठी प्री-वेडिंग शूट करतात. पण लग्नापूर्वी हे नाते तुटते त्यामुळे कुटुंबीयांना समाजात अपमान सहन करावा लागतो, असे यामागचे कारण असल्याचे तेथील समाजाने सांगितले आहे.

लग्न समारंभात कोरिओग्राफर बोलवून त्याच्याकडून डान्स शिकणे याला सर्व समाजाने अश्लिल असल्याचे म्हटले आहे. बाहरेचा व्यक्ती येऊन मुलींना वेगळ्याप्रकारे हात लावतो. ज्यामध्ये अश्लीलता दिसते. तर बऱ्याच ठिकाणी कोरिओग्राफर नवरी मुलीला घेऊन पळून गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे यावर बंदी घालणे गरजेचे आहे, असं या समाजाकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, तरुणांनी या घटनेचा विरोध केला आहे. “आम्हला आमचे स्वातंत्र्य आहे. आम्हाला आमच्या लग्नात काय हवं आहे यावर प्रतिबंध लावणे चुकीचे आहे. जर प्रतिबंध लावायचा असेल, तर हुंडा मागणे आणि हुंडा घेण्यावर लावा. अशा फर्मानामुळे देश पुढे जाणार नाही, तर मागे येईल”, असं मत तेथील तरुणांनी व्यक्त केले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI