Mahad Building Collapse | बिल्डरचा सहकारी युनूस शेखला अटक, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

| Updated on: Aug 29, 2020 | 5:13 PM

युनूस शेख हा तारीक गार्डन इमारतीचे बिल्डर फारुक कांझी याचां स्थानिक सहकारी (Mahad Building Collapse Yunus Shaikh get 14 days Judicial custody) होता.

Mahad Building Collapse | बिल्डरचा सहकारी युनूस शेखला अटक, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
Follow us on

रायगड : महाड येथील काजळीपुरातील तारीक गार्डन इमारत दुर्घटनाप्रकरणी बिल्डरचा स्थानिक सहकारी युनूस शेखला अटक करण्यात आली आहे. नुकतंच युनूस शेखला कोर्टात हजर करण्यात आले. त्याला महाड कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (Mahad Building Collapse Yunus Shaikh get 14 days Judicial custody)

युनूस शेख हा तारीक गार्डन इमारतीचे बिल्डर फारुक महामुद मिया कांझी याचां स्थानिक सहकारी होता. त्याच्या ओळखीने अनेकांनी या इमारतीत घर खरेदी केले होते.

निकृष्ट बांधकाम करणे आणि त्याला मंजूर देणे यासाठी फारुक महामुद मिया काझी (रा.तळोजा, नवी मुबंई), गौरव शहा, व्हिकल्स आर्किटेक्ट अँड कन्स्लटंट (नवी मुंबई), बाहूबली टी. धमाणे, आरसीसी सल्लागार, अवनी कन्स्लटंट (नवी मुंबई), दिपक झिझाड (तत्कालीन मुख्याधिकारी महाड) आणि तत्कालीन कनिष्ट बांधकाम पर्यवेक्षक शशिकांत दिये (महाड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – Mahad Building Collapse | मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख, तर जखमींना 50 हजारांची मदत, मंत्री वडेट्टीवारांची घोषणा

भादंवि कलम 334, 334(अ), 337, 338, 34 नुसार सदोष मनुष्यवध, निष्काळजीपणा करुन इतरांच्या जीवितास दुखापत आणि मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप संबंधितांवर ठेवण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

महाड शहर पोलीस ठाणे हद्दीत काजळीपुरा भागात 05 मजली इमारत 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी सातच्या सुमारास कोसळली. या इमारतीचं नाव तारीक गार्डन असं होतं. यामध्ये 45 ते 47 फ्लॅट होते. या दुर्घटनेत अनेक रहिवाशी अडकले होते. त्यानंतर प्रशासनाने युद्ध पातळीवर बचाव कार्य करण्यास सुरुवात केली. यातील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे.

तब्बल पाच मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली. इमारतीचा पाया खचल्यामुळे ती आहे तशीच खाली बसली. एखादी इमारत तयारी करुन पाडली जाते, अगदी तसंच वाटावं, अशी ही इमारत जागच्या जागी खाली बसली. या दुर्घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. (Mahad Building Collapse Yunus Shaikh get 14 days Judicial custody)

संबंधित बातम्या : 

Mahad Building Collapse | महाड दुर्घटनेप्रकरणी बिल्डरसह 5 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Mahad Building Collapse | मोहम्मदची मृत्यूवर मात, 5 वर्षाचा चिमुकला 19 तासांनी ढिगाऱ्याबाहेर