AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

School Teachers Corona | उस्मानाबादेत 48, नागपुरात 41, बीडमध्ये 25, कोणत्या जिल्ह्यात किती शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह?

शिक्षक कोरोनाबाधित आढळल्याने आता विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. (Maharashtra Teachers Tested Corona Positive before School Opening)  

School Teachers Corona | उस्मानाबादेत 48, नागपुरात 41, बीडमध्ये 25, कोणत्या जिल्ह्यात किती शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह?
| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Nov 21, 2020 | 5:25 PM
Share

मुंबई : येत्या 23 नोव्हेंबरपासून राज्यात इयत्ता नववी ते बारावी शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. यात राज्यातील शेकडो शिक्षकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. शाळा सुरु होण्यापूर्वी इतके शिक्षक कोरोनाबाधित आढळल्याने आता विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. (Maharashtra 115 Teachers Tested Corona Positive before School Opening)

उस्मानाबादमधील 48 तर नागपुरात 41 आणि बीडमधील 25 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आळढले आहेत.

उस्मानाबादमध्ये 48 शिक्षकांना कोरोनाची लागण 

राज्यातील शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर शाळेत शिकविणाऱ्या शिक्षकांचे आणि संबंधित स्टाफ, कर्मचारी यांची कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. मात्र अनेक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह सापडत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात 48 शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. यात उस्मानाबाद शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या 20 शिक्षकांचा समावेश आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात 9 वी ते 12 पर्यंतच्या 491 शाळा असून त्यात 4 हजार 593 शिक्षक आहेत. त्यापैकी 3 हजार 786 शिक्षकांनी कोरोना चाचणी केली आहे. त्यातील 48 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर 3 हजार 702 शिक्षक कोरोना निगेटिव्ह आल्याची माहिती समोर येत आहे.

नागपुरातील 41 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह

नागपूर जिल्ह्यात शाळा उघडण्यापूर्वीच धोक्याची घंटा, जिल्ह्यात आतापर्यंत 41 शिक्षक कोरोना पॅाझिटिव्ह, ग्रामीण भागात 25 शिक्षकांना कोरोनाची लागण, नागपूर शहरात 16 शिक्षकांचे रिपोर्ट पॅाझिटिव्ह, जिल्ह्यात आतापर्यंत ६८२३ शिक्षकांच्या RTPCR चाचण्या पूर्ण, 9 वी ते 12 साठी नागपूर जिल्ह्यात 12031 शिक्षकांची आवश्यकता, 23 तारखेपासून जिल्ह्यातील शाळा होणार सुरु आहेत.

बीड 6500 हजार शिक्षकांची कोरोना चाचणी

राज्यातील शाळा सुरू होण्यापूर्वी बीड जिल्ह्यातील 6500 हजार शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात पहिल्या एक हजार चाचणीत 25 शिक्षक कोरोनाबाधित आढळल्याने प्रशासन आणि पालकांची चिंता वाढली आहे. दरम्यान आज उर्वरित शिक्षकांची कोरोना चाचणी अहवाल आल्यानंतर पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.

सिंधुदुर्ग, नांदेड आणि कोल्हापुरातील शिक्षकही कोरोनाबाधित 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील 8 शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. हे आठही शिक्षक माध्यमिक वर्गातून शिकवणारे शिक्षक आहेत. शाळा सुरु करण्यापूर्वी ख़बरदारीचा उपाय म्हणून संबंधित शिक्षकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत आठ शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले.

नांदेडमधील आठ शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे नांदेडमधील कोरोनाबाधितांची संख्या ही 19 हजार 841 इतकी झाली आहे. तर कोल्हापुरातील 17 शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती शिक्षकांना कोरोना?

  • बीड – 25
  • उस्मानाबाद – 48
  • सिंधुदुर्ग – 8
  • नांदेड – 8
  • कोल्हापूर – 17
  • औरंगाबाद – 9
  • नागपूर – 25

औरंगाबादेत 1393 शिक्षकांची कोरोना चाचणी

औरंगाबाद जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर सर्व शिक्षकांची कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे. त्याअनुषंगाने औरंगाबाद जिल्ह्यात काल 1393 शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीत तब्बल 8 शिक्षक कोरोनाबाधित आढळून आले आहे. तर एक शिक्षकेतर कर्मचारी कोरोनाबाधित आढळला आहे.

दरम्यान अजून जिल्ह्यातील शिक्षकांच्या चाचण्या सुरु आहे. त्यामुळे जर बधितांचा आकडा वाढला तर शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचा फेरविचार केला जाणार आहे.

नागपुरात शाळांमध्ये सॅनिटायझेशनचे काम 

येत्या 23 नोव्हेंबरपासून राज्यात इयत्ता नववी ते बारावी शाळा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्थानिक प्रशासनाला शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. त्यानुसार काही शहरांमध्ये अद्याप शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही.

मात्र नागपूर जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे. शाळा सुरू करताना कोविडच्या नियमांचं पालन करावं लागणार आहे. नागपूर शहरातील शाळांमध्ये सध्या सॅनिटायझेशनचे काम वेगाने सुरू आहे. शाळेतील प्रत्येक वस्तूंचं निर्जंतुकीकरण केलं जातं आहे. त्याशिवाय एकूण 11 हजार 500 शिक्षकांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. (Maharashtra 115 Teachers Tested Corona Positive before School Opening)

संबंधित बातम्या :  

मुंबईतील सर्व शिक्षकांच्या अँटी पीसीआर चाचण्या, पालिका प्रशासनाचा निर्णय

Mumbai School | दिल्ली इफेक्ट, मुंबईतील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार, आयुक्तांचा निर्णय

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी