पोलिसाचा ऑन ड्युटी नैसर्गिक मृत्यू झाल्यास कुटुंबाला तात्काळ 50 हजार, पोलीस महासंचालकांचा मोठा निर्णय

ज्या पोलीस कर्मचाऱ्याचा ड्युटीवर असताना नैसर्गिकरित्या मृत्यू होईल (Police Dies On Duty), त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ 50 हजार रुपये अनुदान मिळेल

पोलिसाचा ऑन ड्युटी नैसर्गिक मृत्यू झाल्यास कुटुंबाला तात्काळ 50 हजार, पोलीस महासंचालकांचा मोठा निर्णय
राज्यात माजी पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल

मुंबई : राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल यांनी पोलीस खात्यातील कर्मचारी यांच्यासाठी महत्वाची घोषणा केली आहे (Maharashtra Police). ज्या पोलीस कर्मचाऱ्याचा ड्युटीवर असताना नैसर्गिकरित्या मृत्यू होईल (Police Dies On Duty), त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ 50 हजार रुपये अनुदान मिळेल, अशी घोषणा महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल यांनी केली. यापूर्वी अशा परिस्थितीत केवळ पाच हजार रुपये मिळत होते (Director General of Police Subodh Kumar Jaiswal).

राज्यात सुमारे दोन लाख पोलीस कर्मचारी आहेत. पोलिसांची नोकरी म्हणजे सतत ताणतणावाची असते. ड्युटीची वेळ नाही, बारा-बारा तास तर कधी सतत एक-दोन दिवसही ड्युटी करावी लागते. कधी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात, तर कधी आरोपीचा माग काढत दिवसेंदिवस अनेक ठिकाणी फिरावं लागतं. या परिस्थितीत जेवणाचे हाल होतात. यामुळे मग अनेक आजार पोलीस कर्मच्यांना जडतात. यातून मग पोलीस कर्मचाऱ्यांना अकाली मृत्यू येतो. एवढं सर्व पोलीस दलासाठी केल्यावर पोलीस दलाकडून सन्मान होतो का? तर तो नाहीच्या बरोबर. मात्र, आता राज्याच्या पोलीस महासंचालकांनी त्यांचा सन्मान करायचा निर्णय घेतला आहे (DGP Subodh Kumar Jaiswal).

पोलीस कर्मचारी घातपात, नक्षलींच्या हल्ल्यातही शहीद होतात. अशा परिस्थितीत जीव गमावलेल्या पोलिसांना अनेक प्रकारे भरघोस मदत मिळत असते. सरकार कडून, पोलीस खात्यातून त्यांना मदत मिळत असते. दुसरीकडे, ज्या कर्मचाऱ्यांचा ड्युटीवर असताना नैसर्गिकरित्या मृत्यू होतो, त्यांना मात्र एवढी मदत मिळत नाही. अशा पोलिसांना पोलीस कल्याण निधीतून तुटपुंजी मदत मिळत होती. मात्र,आता महासंचालक जैस्वाल यांनी घेतलेल्या निर्णयानंतर पोलिसांना समाधानकारक मदत मिळणार आहे. जैस्वाल यांनी अत्यंत चांगला निर्णय घेतल्याचं मत माजी पोलीस कर्मचाऱ्यांची व्यक्त केलं आहे.

राज्याच्या पोलीस महासंचालकानी चांगला निर्णय घेतला आहे. पोलीस दलात कर्तव्य बजावताना नैसर्गिकरित्या मृत्यू झालेल्या पोलिसांच्या कुयूंबियांचे ही अनेक प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठीही पुढाकार घ्यावा, अशी मागणीही पोलीस कर्मचाऱ्यांची केली आहे.

50 thousand rupees help to family of police after natural death

Published On - 9:33 pm, Mon, 23 December 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI