Corona | माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकरांची 91 व्या वर्षी कोरोनावर मात

| Updated on: Aug 02, 2020 | 7:38 PM

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी वयाच्या 91 व्या वर्षी कोरोनावर मात केली (Shivajirao Patil Nilangekar corona free) आहे.

Corona | माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकरांची 91 व्या वर्षी कोरोनावर मात
Follow us on

लातूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी वयाच्या 91 व्या वर्षी कोरोनावर मात केली आहे. शिवाजीराव पाटील-निलंगेकर नुकतंच कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. (Shivajirao Patil Nilangekar corona free)

शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांना 16 जुलैला कोरोनाची लागण झाली होती. त्यांना काही लक्षणं जाणवत होती. त्यावेळी त्यांनी तपासणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. यानंतर 17 दिवसांनी त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी सुटकेचा निश्वा:स सोडला आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

महाराष्ट्रात आतापर्यंत अनेक मंत्री, आमदार, खासदार यांना कोरोनाची बाधा झाली आहे. विद्यमान मंत्र्यांनी कोरोनावर मात केली आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाली होती. अशोक चव्हाण यांना 25 मे रोजी कोरोना झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर त्यांना उपचारासाठी नांदेडवरुन मुंबईला हलवलं होतं. त्यानंतर उपचाराअंती अशोक चव्हाण यांना 4 जूनला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

सर्वात आधी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मग सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची बाधा झाली होती. या सर्वांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. (Shivajirao Patil Nilangekar corona free)

संबंधित बातम्या : 

महाराष्ट्राच्या आणखी एका माजी मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण

Amitabh Bachchan | बिग बींनी कोरोनाला हरवलं, अमिताभ बच्चन यांना डिस्चार्ज