महाराष्ट्राच्या आणखी एका माजी मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण

महाराष्ट्राच्या आणखी एका माजी मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण

कॉंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर (Shivajirao Patil Nilangekar corona) यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

सचिन पाटील

|

Jul 16, 2020 | 1:33 PM

लातूर : महाराष्ट्राच्या आणखी एका माजी मुख्यमंत्र्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. कॉंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर (Shivajirao Patil Nilangekar corona) यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 89 वर्षीय शिवाजीराव निलंगेकर पाटील यांना गेल्या तीन दिवसांपासून लक्षणे जाणवत होती. त्यामुळे त्यांनी तपासणी केली असता कोरोनाची लागण झाल्याचं समोर आले आहे. ते लातूर जिल्ह्यातील निलंगा इथं राहतात. आता त्यांना उपचारासाठी पुण्याला हलवण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे. (Shivajirao Patil Nilangekar corona)

महाराष्ट्रात आतापर्यंत अनेक मंत्री, आमदार, खासदार यांना कोरोनाची बाधा झाली आहे. विद्यमान मंत्र्यांनी कोरोनावर मात केली आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाली होती. अशोक चव्हाण यांना 25 मे रोजी कोरोना झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर त्यांना उपचारासाठी नांदेडवरुन मुंबईला हलवलं होतं. त्यानंतर उपचाराअंती अशोक चव्हाण यांना 4 जूनला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

सर्वात आधी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मग सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची बाधा झाली होती. या सर्वांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. (MP Kapil Patil Tested Corona Positive)

मंत्री हसन मुश्रीफ सेल्फ क्वारंटाईन

नुकतंच राज्याचे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वत:ला क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाची वाढती बाधा आणि राजकीय कार्यक्रमांमुळे आलेले संपर्क यामुळे मुश्रीफ सेल्फ क्वारंटाईन झाले आहेत. त्यांनी आठडाभरातील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.

संबंधित बातम्या 

Hasan Mushrif | ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ सेल्फ क्वारंटाईन, आठवड्यातील सर्व कार्यक्रम रद्द

BJP MLA Abhimanyu Pawar Corona | भाजप आमदार अभिमन्यू पवार यांना कोरोनाची लागण, मुलालाही संसर्ग

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात होम क्वारंटाईन, बंगल्यावरील टेलिफोन ऑपरेटर कोरोना पॉझिटिव्ह

भाजपचे खासदार कपिल पाटील यांना कोरोनाची लागण, कुटुंबातील आठ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें