मुंबई-पुणे महामार्गावर शबाना आझमींच्या मदतीला धावणाऱ्या जवानाला शौर्य पुरस्कार

मुंबई-पुणे महामार्गावर 18 जानेवारी रोजी खालापूर टोलनाक्याजवळ शबाना आझमी यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात त्या गंभीररित्या जखमी झाल्या होत्या.

मुंबई-पुणे महामार्गावर शबाना आझमींच्या मदतीला धावणाऱ्या जवानाला शौर्य पुरस्कार
Follow us
| Updated on: Jan 30, 2020 | 12:44 PM

पुणे : ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांना मुंबई-पुणे महामार्गावर अपघातात मदत करणाऱ्या महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानाला शौर्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं आहे. या जवानाचं नाव विवेकानंद अनिल योगे असं आहे. हा पुरस्कार लाईफ सेविंग फाऊंडेशन संस्थेद्वारे देण्यात आला. महाराष्ट्राचे सह पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे यांच्याहस्ते विवेकानंद योगे यांना पुरस्कार प्रधान करण्यात आला (Soldier received bravery award for helped Shabana Azmi).

मुंबई-पुणे महामार्गावर 18 जानेवारी रोजी खालापूर टोलनाक्याजवळ शबाना आझमी यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात त्या गंभीररित्या जखमी झाल्या होत्या. त्यावेळी अपघाताच्या घटनास्थळापासून विवेकानंद एक किलोमीटरच्या अंतरावर होते. त्यांना अपघाताची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि शबाना आझमी यांना मदत केली. त्यांच्या याच कामगिरीमुळे त्यांना पुरस्कार प्रधान करण्यात आला आहे.

दरम्यान, मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक सुरक्षेसंदर्भात पुणे शहर पोलिसांनी एक प्रसिद्ध पत्रक जारी केलं आहे. “महाराष्ट्र सुरक्षा दलाचे 117 जवान मुंबई-पुणे महामार्गावर तैनात असतात. हे सर्व जवान तीन शिफ्टमध्ये काम करत वाहतूक सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतात. महामार्गावर अपघात घडल्यास अपघातग्रस्तांना सर्व प्रकारची मदत करतात. या सर्व जवानांचे नेतृत्व निवृत्त पोलीस निरीक्षक चंद्रकांत जगलपुरे करत आहेत. आपल्या टीमचं नेतृत्व लिलयापणे पेलणाऱ्या जगलपुरे यांचादेखील गौरव लाईफ सेविंग फाउंडेशनतर्फे करण्यात आला आहे”, असं त्या प्रसिद्ध पत्रात म्हटलं आहे.

Soldier received bravery award for helped Shabana Azmi

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.