गांधीजींवर पत्रलेखन स्पर्धा, राज्यपाल कोश्यारींना पहिलं पारितोषिक

| Updated on: Jun 16, 2020 | 12:10 AM

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आंतरदेशीय पत्र प्रवर्गात राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक मिळाले आहे. (Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari win first prize in Letter Writing)

गांधीजींवर पत्रलेखन स्पर्धा, राज्यपाल कोश्यारींना पहिलं पारितोषिक
Follow us on

मुंबई : महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त डाक विभागाच्या महाराष्ट्र व गोवा परिमंडळाने “ढाई आखर” ही राज्यस्तरीय पत्रलेखन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आंतरदेशीय पत्र प्रवर्गात राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक मिळाले आहे. (Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari win first prize in Letter Writing)

मुंबई डाक विभागाचे वरिष्ठ अधिक्षक पी. सी. जगताप आणि सहाय्यक अधिक्षक एस. डी. खरात यांनी आज (15 जून) राज्यपालांची राजभवन या ठिकाणी भेट घेतली. या दरम्यान त्यांनी राज्यपालांना प्रथम पुरस्काराचा 25 हजार रुपये रकमेचा चेक सुपूर्द केला.

“प्रिय बापू आप अमर है” या विषयावरील पत्रलेखन स्पर्धेत लिफाफा आणि आंतरदेशीय पत्र अशा दोन भागात ही स्पर्धा होती. यात स्पर्धेत 80 हजार पेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतला होता, अशा माहिती डाकसेवा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

गेल्या वर्षी 6 नोव्हेंबर 2019 रोजी भारतीय डाक व‍िभागाच्या वतीने मुंबईपेक्स या दुर्मिळ टपाल तिकीट प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते झाले होते. त्यावेळी त्यांना या पत्र लेखन स्पर्धा आयोजित केल्याबद्दल डाक विभागाचे कौतुक केले होते. तसेच या स्पर्धेत आपण स्वत: सहभागी होऊ, असे राज्यपालांनी जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी आंतरदेशीय पत्रावर महात्मा गांधी यांच्या जीवनावर निबंध लेखन करुन स्पर्धेत पाठविला होता. (Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari win first prize in Letter Writing)

संबंधित बातम्या : 

Devendra Fadnavis | मुंबईतील 950 पेक्षा जास्त कोरोना मृत्यू का लपवले?, फडणवीसांचा सवाल, मुख्यमंत्र्यांना पत्र

Exam controversy | पवारांचा ऑक्सफर्डचा दावा तावडेंनी खोडला, तर विद्यार्थ्यांसाठी संघर्षाची शेलारांची तयारी