Lockdown 4 | महाराष्ट्रातील लॉकडाऊनमध्ये 31 मेपर्यंत वाढ

| Updated on: May 17, 2020 | 1:56 PM

महाराष्ट्रातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. नुकतंच याबबतची घोषणा (Maharashtra Lockdown Extension) करण्यात आली.

Lockdown 4 | महाराष्ट्रातील लॉकडाऊनमध्ये 31 मेपर्यंत वाढ
Follow us on

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला (Maharashtra Lockdown Extension) आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. हा लॉकडाऊनचा चौथा टप्पा आहे.  त्यामुळे आता पुढील 14 दिवस राज्यात सर्वच ठिकाणी लॉकडाऊन कायम राहणार आहे.

लॉकडाऊनबाबत महाविकास आघाडीच्या मंत्र्यांची गुरुवारी बैठक पार पडली होती. या बैठकीत लॉकडाऊन वाढवण्याविषयी निर्णय झाल्याची माहिती आहे. ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील सवलती अधिक वाढण्याचे संकेत आहेत. तर रेड झोनमध्ये ‘कोरोना’बाबत अधिक काळजी घेतली जाणार आहे.

लॉकडाऊन वाढवताना राज्याचे आर्थिक चक्र सुरु राहण्याची काळजी राज्य सरकार घेणार आहे. यापूर्वी राज्यात काही अटी आणि नियमांसह उद्योगधंदे सुरु करण्यात आले आहेत. आणखी काही उद्योगधंदे सुरु करण्याबाबत सरकार आराखडा आखण्याची शक्यता आहे.

लॉकडाऊन कसा वाढत गेला?

  • पहिला लॉकडाऊन – 25 मार्च ते 14 एप्रिल (21 दिवस)
  • दुसरा लॉकडाऊन – 15 एप्रिल ते 3 मे (19 दिवस)
  • तिसरा लॉकडाऊन – 4 मे ते 17 मे (14 दिवस)
  • चौथा लॉकडाऊन – 18 मे ते 31 मे (14 दिवस)

देशात 25 मार्चपासून पहिला लॉकडाऊनचा टप्पा सुरु झाला. 21 दिवसांचा पहिला टप्पा 14 एप्रिलला संपला. दुसरा लॉकडाऊन 15 एप्रिल ते 3 मे असा होता. तिसरा लॉकडाऊन 3 मे रोजी सुरु होऊन 17 मेपर्यंत चालला. 17 मेनंतर चौथ्या लॉकडाऊनबाबत प्रत्येक राज्याने आढावा घेऊन सूचना द्यावा, असे पंतप्रधानांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगितले होते.

“मुंबई आजही रेड झोनमध्ये आहे. त्यामुळे रेड झोनचा लॉकडाऊन लगेच उठेल असे दिसत नाही. ऑरेंज झोनमध्ये कंटन्टेंमेट झोन आहे. ग्रीनमध्ये ते नाहीत. ऑरेंजमधील कंटेन्टेंमेट झोन वगळून इतर ठिकाणी दुकान सुरु करता येतील. रजिस्ट्रेशन, गाड्यांची खरेदी विक्री सुरु होती. त्यानिमित्ताने सरकारला आर्थिक स्त्रोत सुरु होईल,” असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले होते.

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 30 हजार पार 

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येने 30 हजाराचा टप्पा ओलांडला (Maharashtra Corona Cases) आहे. राज्यात काल 1 हजार 606 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 30 हजार 706 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे दिवसभरात आतापर्यंत सर्वाधिक 67 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आज 1 हजार 606 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 30 हजार 706 वर पोहोचली आहे. तर राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 22 हजार 479 वर पोहोचली आहे. तर कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या मुंबईत दिवसभरात 884 नवे रुग्ण आढळले आहे. तर 41 जणांचा मृत्यू झाला (Maharashtra Lockdown Extension) आहे.

संबंधित बातम्या : 

Maharashtra Corona Cases | राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 30 हजार पार, दिवसभरात 67 मृत्यू, 1606 नवे रुग्ण

Lockdown 4 | लॉकडाऊन 4 बाबत नियम काय असू शकतात? राजेश टोपे म्हणतात…..