Maharashtra Rain | मुंबई-पुण्यासह राज्यभरात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज

कोकण, गोवा, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा आणि काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Rain | मुंबई-पुण्यासह राज्यभरात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज
| Updated on: Jul 26, 2020 | 6:35 PM

पुणे : राज्यात आजपासून पुढील चार दिवस सर्वदूर पावसाचा अंदाज (Maharashtra Rain Updates) हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण, गोवा, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा आणि काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर पुणे आणि मुंबईतही पावसाचा अंदाज आहे (Maharashtra Rain Updates).

रविवारी 26 जुलै रोजी कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. त्याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. तर कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याच्या वाऱ्यासह वारा वाहण्याचा इशारा आहे.

तर सोमवारी कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

तर मंगळवारी 28 जुलै रोजी कोकण, गोव्यात आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा आहे. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे (Maharashtra Rain Updates).

त्याचबरोबर बुधवारी 29 तारखेला कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा आहे.

तर पुण्यात रविवारी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्यात 27 ते 30 तारखेपर्यंत हलक्‍या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्‍यता आहे.

तर मुंबई आणि उपनगरात आजपासून पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज आहे. आकाश सामान्यत ढगाळ राहणार असून मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि अधून मधून जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे.

Maharashtra Rain Updates

संबंधित बातम्या :

पुढील पाच दिवसात विदर्भात तुरळक पाऊस, नागपूर हवामान विभागाचा अंदाज