माणुसकी दाखवा, चूक माणसाकडूनच होते, अभिनेत्री माहिका शर्माकडून कनिकाची पाठराखण

"चूक माणसाकडूनच होते. कनिकाला सध्या प्रार्थनेची गरज आहे", असं बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल माहिका शर्मा (Mahika Sharma support Kanika Kapoo) म्हणाली आहे.

माणुसकी दाखवा, चूक माणसाकडूनच होते, अभिनेत्री माहिका शर्माकडून कनिकाची पाठराखण
Follow us
| Updated on: Mar 23, 2020 | 7:27 PM

नवी दिल्ली : “चूक माणसाकडूनच होते. कनिकाला सध्या प्रार्थनेची गरज आहे”, असं बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल माहिका शर्मा (Mahika Sharma support Kanika Kapoo) म्हणाली आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध पार्श्वगायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर अनेकांकडून तिच्यावर प्रचंड टीका करण्यात आली. मात्र, त्यानंतर आता काही लोक कनिकाच्या पाठिमागे उभे राहताना दिसत आहेत. याअगोदर अभिनेत्री सोनम कपूरने तिला पाठिंबा दिला होता. त्यापाठोपाठ माहिका शर्माने कनिकाची पाठराखण केली आहे (Mahika Sharma support Kanika Kapoo).

माहिका शर्मा नेमकं काय म्हणाली?

“चूक माणसाकडूनच होते. कनिकाला सध्या प्रार्थनेची गरज आहे. कनिकाने जी चूक केली आहे ती पाहता तिला माफ करता येऊ शकत नाही. मात्र, तिच्यावर जे आरोप लावले आहेत त्याबाबत ती बरी झाल्यावरच निर्णय होईल. सध्या आपल्याला तिच्याप्रती माणुसकी दाखवायची गरज आहे”, असं कनिका म्हणाली.

“कनिका कपूर ज्या हॉटेलमध्ये थांबली होती त्या हॉटेलचा संपूर्ण स्टाफ आणि कर्मचाऱ्यांची तपासणी व्हावी”, अशी मागणी माहिकाने उत्तर प्रदेश सरकारकडे केली आहे.

कनिका कपूर लंडनमध्ये होती. तिथून लखनौला परत आल्यावर तिने पार्टी आयोजित केली होती. पार्टीला राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि त्यांचे पुत्र खासदार दुष्यंत सिंहसुद्धा उपस्थित होते. यांच्यासह जवळपास 500 पाहुण्यांनी हजेरी लावली होती. दरम्यान, फक्त राजकीय नेत्यांची तपासणी न करता गरिबांचीदेखील तपासणी व्हावी, अशी मागणी माहिकाने केली.

कनिकानेच कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली

कनिका कपूरला कोरोनाची लागण झाल्याचं तीन दिवसांपूर्वी समोर आलं होतं. कनिका कपूरने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं होतं.

विमानतळावर तिचं थर्मल स्क्रॅनिंग झालं होतं. (Kanika Kapoor Found Corona Positive) मात्र, तेव्हा तिला कोरोना झाल्याची लक्षणं नव्हती असंही तिने सांगितलं. मात्र, ती विमानतळावरुन पळून गेल्याचा आरोप तिच्यावर होतो आहे. ‘आज तक’च्या बातमीनुसार, कनिका कपूर ही विमानतळावरील ग्राऊंड स्टाफच्या मदतीने बाथरुममध्ये लपली, त्यानंतर तिने तेथून पळ काढला. कनिका ही 15 मार्चला लंडनहून लखनऊला आली होती.

कनिकाने रविवारी 15 मार्चला लखनऊ येथील शालिमार गॅलंट अपार्टमेंटमध्ये एका पार्टीचं आयोजन केलं होतं. यामध्ये लखनऊचे अनेक बडे अधिकारी आणि नेते मंडळी सहभागी झाले होते. या पार्टीमध्ये एकूण 125 जण सहभागी झाल्याची माहिती आहे. कनिकाला कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आल्यानंतर संपूर्ण इमारतीत गोंधळ उडाला आहे. प्रत्येकजण घाबरलेला आहे. तसेच, या पार्टीमध्ये कॅटेरिंग सर्व्हिस पुरवलेले कर्मचारीही दहशतीखाली आहेत.

याशिवाय, कनिका ही लखनऊच्या ताज हॉटेलमध्ये थांबल्याचीही माहिती आहे. तर शालिमार गॅलंट अपार्टमेंटमधील अनेकजण ही माहिती मिळाल्यानंतर इमारत सोडून दुसरीकडे राहायला जात आहेत. कमिका कपूरचं संपूर्ण कुटुंब या इमारतीत राहातं. आता तिच्या संपूर्ण कुटुंबाला क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

आरोग्य विभागाकडून त्या सर्वांना फोन

कनिका कपूरला कोरोना झाल्याचं कळताच लखनऊ आरोग्य विभागाने तिच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला फोन केला आहे. त्या सर्व लोकांनी स्वत:ला क्वारंटाईन करावं असं आरोग्य विभागाने सांगितलं आहे. तसेच, कनिकाच्या संपर्कात आलेल्या कुठल्याही व्यक्तीला अद्याप कोरोनाची लागण झालेली नाही, (Kanika Kapoor Found Corona Positive) असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या :

Corona | ‘बेबी डॉल’ गायिका कनिका कपूरला कोरोना, विमानतळावरुन पळाल्याचा आरोप

‘कोरोना’ग्रस्त गायिका कनिका कपूरसोबत पार्टी, वसुंधरा राजे-दुष्यंत सिंहही ‘क्वारंटाईन’

Non Stop LIVE Update
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या.
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?.
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.