नवरात्रोत्सव काळात अंबाबाई मंदिराला कोरोनाचा मोठा फटका, देवस्थान समितीच्या उत्पन्नात जवळपास 5 कोटींची घट

कोरोनामुळं राज्यातील मंदिरं अजूनही बंद आहेत. नवरात्रोत्सव काळातही राज्यातील साडेतीन शक्तिपीठं बंदच होती. त्याचा फटका कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराला बसला आहे. नवरात्रोत्सव काळात देवस्थान समितीच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे.

नवरात्रोत्सव काळात अंबाबाई मंदिराला कोरोनाचा मोठा फटका, देवस्थान समितीच्या उत्पन्नात जवळपास 5 कोटींची घट
दिवाळी पाडव्यानिमित्त कोल्हापूरच्या अंबाबाईची काकड आरती करण्यात आली. पाहा अंबाबाईचं खास रुप. (सर्व फोटो सौजन्य- VAM Photo Studio)
Follow us
| Updated on: Oct 28, 2020 | 3:28 PM

कोल्हापूर: ऐन नवरात्रोस्तव काळात कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर भाविकांसाठी बंद असल्यानं त्याचा मोठा फटका देवस्थान समितीच्या उत्पन्नाला बसला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं कायम ठेवला आहे. त्यामुळं नवरात्रोत्सव काळातही राज्यातील मंदिरं बंदच होती. (Major decline in the revenue of the Ambabai temple because of corona and lockdown )

नवरात्रोत्सव काळात दरवर्षी लाखो भाविक अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापुरात येत असतात. भाविकांकडून सोन्या-चांदिच्या दागिन्यांसह 5 ते 7 कोटी रुपयांचं दान देवीच्या चरणी अर्पण केलं जातं. मात्र, यावर्षी मंदिर बंद असल्यानं ऑनलाईन देणगीच्या माध्यमातून फक्त 1 कोटी 12 लाख रुपये देवस्थान समितीकडे जमा झाले आहेत. पूर्ण वर्षाच्या विचार केल्यास अंबाबाई मंदिर आणि ज्योतिबा मंदिराकडून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला २० कोटी रुपये प्राप्त होतात. मात्र कोरोना आणि लॉकडाऊनमुळं गेल्या 7 महिन्यांपासून मंदिरं बंद आहेत. त्यामुळं मंदिर समितीच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे.

कोरोनामुळं मंदिरं बंद असली तरी देवस्थान समितीचा खर्च जैसे थेच आहे. त्यामुळं मंदिरं लवकर सुरु झाली नाहीत तर देवस्थान समित्यांची आर्थिक घडी विस्कटेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

भाजप अध्यात्मिक आघाडीचा सरकारला इशारा

राज्यातील मंदिरं अद्याप बंदच आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपची अध्यात्मिक आघाडी पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. भाजप अध्यात्मिक समन्वय आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत मंदिरं सुरु करण्याची मागणी केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत जैन, बौद्ध, शिख, महानुभाव, इस्कॉन, सन्यासी आणि वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी उपस्थित होते. 1 नोव्हेंबरपर्यंत राज्यातील मंदिरं सुरु करा, अन्यथा मंदिरांची टाळी तोडणार असा इशाराच तुषार भोसले यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या: 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी अंबाबाईची नगरप्रदक्षिणा साधेपणाने संपन्न

मंदिरे उघडण्याच्या मागणीवरुन भाजप अध्यात्मिक आघाडी पुन्हा आक्रमक, राज्यपालांची भेट, मंदिरांचे टाळे तोडण्याचा इशारा

Major decline in the revenue of the Ambabai temple because of corona and lockdown

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....