पुणे : शौचास गेलेल्या महिलेवर नराधमाने हल्ला करुन डोळा काढला, शिरुर तालुक्यातील संतापजनक घटना

रात्री नऊ वाजेच्या सुमारास शौचास गेलेल्या एका महिलेवर हल्ला करुन तिचे डोळे काढण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे (man attacked on woman and removed her eyes).

पुणे : शौचास गेलेल्या महिलेवर नराधमाने हल्ला करुन डोळा काढला, शिरुर तालुक्यातील संतापजनक घटना

पुणे : शिरुर तालुक्यातील न्हावरे गावात संतापजनक घटना घडली आहे. रात्री नऊ वाजेच्या सुमारास शौचास गेलेल्या एका महिलेवर हल्ला करुन तिचे डोळे काढण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. पीडित महिलेला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेप्रकरणी आरोपी विरोधात शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे (man attacked on woman and removed her eyes).

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्हावरे गावातील बिडगर-सुर्यवंशी वस्ती येथे वास्तवास असलेल्या मुक्ता राजू चित्रे या मंगळवारी (3 नोव्हेंबर) रात्री 9 वाजेच्या सुमारास शौचास गेल्या होत्या. त्यावेळी तिथे एक नराधम त्यांच्याकडे पाहू लागला. त्यामुळे तुला बाईमाणूस दिसत नाही का? असं मुक्ता चित्रे त्या नराधमाला म्हणाल्या. त्यानंतर त्या नराधमाने मुक्ता यांच्यावर हल्ला करत त्यांचा एक डोळा काढला. तर दुसऱ्या डोळ्यालादेखील गंभीर जखमी केलं.

मुक्ता चित्रे यांचे कुटुंबीय त्यांचा शोध घेत घटनास्थळी पोहोचले तेव्हा मुक्ता तिथे गंभीर जखमी होऊन निपचित पडल्या होत्या. त्यावेळी त्यांचा एक डोळा जमिनीवर पडला होता. तर दुसऱ्या डोळ्याही गंभीर जखमी होता. या घटनेची तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची माहिती घेतली.

महिलेला उपचारासाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. महिलेचा दुसरा डोळादेखील गंभीर जखमी आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, महिलेचा दुसरा डोळादेखील वाचण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान, हल्लेखोराला तातडीने अटक करा, अशी मागणी ग्रामस्थानी केली आहे.

घडलेल्या घटनेची गंभीर दखल घेत पुणे (ग्रामीण) पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, शिरुरचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी घटनास्थळाची बुधवारी दुपारी पाहणी केली (man attacked on woman and removed her eyes). या घटनेप्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे.

हेही वाचा : धुळ्यात पोलिसांकडून गांजाची शेती उद्ध्वस्त, 6 लाखांची गांजा रोपं जप्त

Published On - 11:14 pm, Wed, 4 November 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI