AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Subodh Bhave | काळजी घ्या, मस्त रहा, मी माझं ट्विटर अकाऊंट डिलीट करतोय : सुबोध भावे

मराठी अभिनेता सुबोध भावेने ट्विटरला रामराम केला आहे. (Marathi Actor Subodh Bhave Twitter Account Delete)

Subodh Bhave | काळजी घ्या, मस्त रहा, मी माझं ट्विटर अकाऊंट डिलीट करतोय : सुबोध भावे
| Edited By: Anish Bendre | Updated on: Sep 23, 2020 | 4:31 PM
Share

मुंबई : मराठीतील आघाडीचा अभिनेता सुबोध भावे याने त्याचे ट्विटर अकाऊंट डिलीट केले आहे. याबाबतची अधिकृत घोषणा त्याने स्वतः ट्विटरच्या माध्यमातूनच केली आहे. आपण ट्विटरपासून दूर जात असल्याची माहिती त्याने एका पोस्टच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे. (Marathi Actor Subodh Bhave Twitter Account Delete)

सोशल मीडियावर सक्रीय असणारा सुबोध भावे गेल्या काही दिवसांपासून घरीच क्वारंटाईन आहे. काही दिवसांपूर्वी सुबोध भावे, त्याची पत्नी मंजिरी आणि मुलगा कान्हा यांना कोरोनाची लागण झाली होती. या संदर्भातील माहिती त्याने ट्विटरवरून दिली होती. भावे कुटुंबाने कोरोनावर मातही केली. मात्र अचानक सुबोधच्या निर्णयाने चाहते चक्रावले आहेत.

दरम्यान, कोरोनाच्या संकटकाळात, लॉकडाऊनमध्ये, क्वारंटाईन काळातही सुबोध भावे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत नेहमी संपर्कात होता. आता मात्र या ट्विटनंतर त्याचे ट्विटरवरील चाहते काहीसे खट्टू झाले आहेत.

ट्विटरच्या माध्यमातून इतका सक्रीय असणाऱ्या सुबोधने अचानक अकाऊंट डिलीट करण्यचा निर्णय का घेतला असावा, असा प्रश्न त्याच्या चाहत्यांसह नेटकऱ्यांनाही पडला होता. मात्र त्याने आपल्या चाहत्यांचा हा संभ्रमही दूर केला आहे. एकूणच वाढत्या नकारात्मकतेमुळे हे अकाऊंट डिलीट करत असल्याचे त्याने म्हटले आहे. या व्यतिरिक्त आणखी कुठलेही कारण अद्याप समोर आलेले नाही.

“आपल्या सर्वांच प्रेम आणि आशीर्वाद मिळाला त्याबद्दल धन्यवाद. मी माझा ट्विटर अकाउंट डिलिट करतो आहे. काळजी घ्या ,मस्त रहा! जय महाराष्ट्र, जय हिंद,” असे ट्वीट सुबोध भावे याने केले आहे.

दरम्यान, सुबोध भावे आपल्या ‘कान्हाज मॅजिक’ या निर्मिती संस्थेद्वारे ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेची निर्मिती करत आहे. ‘आतापर्यंत आपण सूडाच्या अनेक मालिका पाहिल्या आहेत. आता ‘शुभमंगल ऑनलाइन’च्या माध्यमातून एक हलकीफुलकी कथा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे’, अशा शब्दांत अभिनेता सुबोध भावेने आपल्या निर्मिती संस्थेद्वारे निर्मित केलेल्या पहिल्यावहिल्या मालिकेचे वर्णन केले.

‘कान्हाज मॅजिक’ या निर्मिती संस्थेद्वारे सुबोधची ही मालिका कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यामध्ये सायली संजीव आणि सुयश टिळक अशी नवीन जोडी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

संबंधित बातम्या : 

लीलावती हॉस्पिटलवर झरीन खान भडकली, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

आशालता ताईंच्या जाण्याने आमची 35 वर्षांची नाळ तुटली, अलका कुबल यांना शोक अनावर

(Marathi Actor Subodh Bhave Twitter Account Delete)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली