साताऱ्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

सासरच्या मंडळीच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली (Marriage woman suicide Satara)  आहे.

साताऱ्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

सातारा : सासरच्या मंडळीच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली (Marriage woman suicide Satara)  आहे. ही धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात घडली. या घटनेमुळे जिल्ह्यात सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नवऱ्यासह सासरच्या मंडळींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आसमा अस्लम (23) असं आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव (Marriage woman suicide Satara) आहे.

आसमाचे लग्न 2017 मध्ये झाले. लग्नानंतर तिच्यावर सासरच्यांकडून सतत जाचहट केला जात होता. मुंबईत मोबाईल शॉप टाकण्यासाठी माहेरहून तीन लाख रुपये घेऊन येण्यासाठी तिला सतत जाचहट केला जात होता. त्यामुळे सततच्या जाचाला कंटाळलेल्या विवाहितेने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

याप्रकरणी आसमाचा नवरा असलम जाफर मुलाणी, सासरा जाफर दादाभाई मुलाणी, सासू अफसाना जाफर मुलाणी, दुसरी सासू अमजद जाफर मुलाणी यांच्या विरुद्ध म्हसवड पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

संबंधित बातम्या :

सासरच्यांकडून हुंड्यासाठी छळ, लग्नानंतर पाच महिन्यात विवाहितेची आत्महत्या

लठ्ठ असल्याच्या टोमण्यामुळे विवाहितेची आत्महत्या

Published On - 7:52 am, Fri, 8 May 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI