PHOTO : मनमोहक ‘माया’वी अदा, रुचिरा जाधवचे हॉट फोटोशूट
झी मराठी वाहिनीवरील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत मायाची भूमिका लोकप्रिय झाली आहे. (Mazya navryachi bayko Fame Ruchira Jadhav Photos)

- झी मराठी वाहिनीवरील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत मायाची भूमिका लोकप्रिय झाली आहे.
- मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव मायाचे पात्र साकारत आहे.
- रुचिराही ही मालिकेप्रमाणे खऱ्या आयुष्यातही तितकीच ग्लॅमरस आणि बोल्ड आहे.
- ती नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.
- रुचिराने काही दिवसांपूर्वी एक हॉट फोटोशूट केलं होतं. त्याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
- रुचिराच्या मनमोहक ‘माया’वी अदांमुळे तिचे चाहते क्लिन बोल्ड झाले आहे.
- रुचिराने कलर्स मराठीवरील तुझ्यावाचून करमेना या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदापर्ण केलं.
- बे दुणे दहा, माझे पती सौभाग्यवती, प्रेम हे यासारख्या अनेक मालिकांमध्येही तिने काम केले आहे.
- लव लफडे, सोबत या मराठी चित्रपटातही तिने काम केले आहे.
- माझ्या मित्राची गर्लफ्रेंड, बंच ऑफ रेड रोझेस या सारख्या वेबसीरीजमध्येही काम केलं आहे.
- रुचिराने मालिकेप्रमाणे नाटकातही काम केले आहे
- रुचिराने पराग विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. तर मुंबईतील के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, तिने पदवीचं शिक्षण घेतलं आहे.












