कंटेन्मेंट झोनमधील सर्व दुकानं बंद, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाकडून नव्या गाईडलाईन्स जारी

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत (Ministry of Health released new guidelines on Corona Pandemic).

कंटेन्मेंट झोनमधील सर्व दुकानं बंद, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाकडून नव्या गाईडलाईन्स जारी
| Updated on: Nov 30, 2020 | 10:36 PM

नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. या नव्या गाईडलाईन्सनुसार कंटेन्मेंट झोन परिसरातील सर्व दुकान बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. तर कंटेन्मेंट झोन बाहेरील दुकानांना उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे (Ministry of Health released new guidelines on Corona Pandemic).

ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि लहान मुलांना फक्त आवश्यक असल्यास घराबाबेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर आणि मास्कचा वापर करण्याची सक्ती करण्यात आली आहे.

ज्या दुकांनांमध्ये जास्त गर्दी असते अशा दुकानांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. गाईडलाईन्सचे निर्देश अंमलात यावे यासाठी आरोग्य मंत्रालय मार्केटच्या ओनर असोसिएशनसोबत चर्चा करणार आहे (Ministry of Health released new guidelines on Corona Pandemic).

गाईडलाईन्सनुसार, सर्व दुकानदारांना दुकान उघडण्याआधी दररोज संपूर्ण दुकान सॅनेटाईज करणं अनिवार्य राहील. याशिवाय दुकानाच्या ज्या भागात ग्राहकांची सारखी ये-जा किंवा रेलचेल असते असा भाग दिवसभरातून अनेकवेळा सॅनेटाईज करण्याचा आदेश देण्यात आला, ज्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळता येईल.

सार्वजनिक शौचालये, पणीपोयी असलेल्या ठिकाणी दररोज दोन ते तीन वेळा स्वच्छता करावी. ज्या ठिकाणी लोकांची दररोज रेलचेल असते अशा ठिकाणीही सॅनेटाईज करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचं पालन व्हावं यासाठी मार्केट असोसिएशनने नव्या समितीची स्थापन करावी, असे निर्देश गाईडलाईन्समध्ये देण्यात आले आहेत. कोणत्याही बाजारात नियमांचं योग्य पालन होताना दिसलं नाही तर तो बाजार बंद करण्यात येऊ शकतो, असा इशाराही गाईडलाईन्समध्ये देण्यात आला आहे.

हेही वाचा : ‘निवार’ची झळ सोसत असताना तामिळनाडूवर पुन्हा संकटाचं सावट, आणखी एक भयावह चक्रीवादळ धडकण्याची शक्यता