केंद्राचं Electric साठी सबकुछ! 25 KMला एक; 16 महामार्गावर 1576 Charging Stations
अवजड उद्योग मंत्रालयानं 16 राज्यमार्ग आणि 9 एक्सप्रेसवे साठी 1576 चार्जिंग स्टेशनला मान्यता दिली आहे. मंत्रालयानं निर्णयासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला 25 किलोमीटरच्या अंतरावर किमान एक चार्जिंग स्टेशन उभारले जाईल.

नवी दिल्ली : इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric Vehicles) वापराला चालना देण्यासाठी केंद्रानं महत्वाचं पाऊल हाती घेतलं आहे. फेम इंडिया योजनेच्या (FAME India Scheme) दुसऱ्या टप्प्यात अवजड उद्योग मंत्रालयानं 1576 इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिग स्टेशन (EV Charging Stations) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. अवजड उद्योग मंत्रालयानं 16 राज्यमार्ग आणि 9 एक्सप्रेसवे साठी 1576 चार्जिंग स्टेशनला मान्यता दिली आहे. मंत्रालयानं निर्णयासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला 25 किलोमीटरच्या अंतरावर किमान एक चार्जिंग स्टेशन उभारले जाईल. त्यासोबतच 100 किलोमीटरच्या अंतरावर महामार्गाच्या दोन्ही बाजूला लाँग रेंज हेवी ड्यूटी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येतील. FAME योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात अवजड उद्योग मंत्रालयानं 2877 चार्जिंग स्टेशनच्या उभारणीला मान्यता दिली आहे.
इलेक्ट्रिक महामार्ग:
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्ली ते जयपूर देशातील पहिला इलेक्ट्रिक महामार्ग बनविण्याचे स्वप्न असल्याचं म्हटलं होतं. मणिपुर, सिक्किम, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि कश्मीर मध्ये रोपवे केबल उभारणीसाठी सरकारकडे आतापर्यंत 47 प्रस्ताव प्राप्त झाले. अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प 2022-23 मध्ये रस्ते व परिवहन मंत्रालयासाठी 1.99 लाख कोटी रुपयांची तरतूद केली होती.
चार्जिंग स्टेशनचं जाळं:
केंद्र सरकारने देशभरात ईलेक्ट्रिक वाहनांसाठीचे चार्जिंग पॉईंटस उभारण्याची योजना आखली आहे. नव्याने उभारण्यात येणारे चार्जिंग स्टेशन भारतातील 68 शहरे, 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी असणार आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी यासंदर्भातील माहिती दिली. देशातील सरकारी मालकीच्या पेट्रोलियम कंपन्या HPC, BPCL आणि IOC देशात 22 हजार इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स स्थापन करतील. BPCL देशात 7000 ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. त्याचवेळी, HPCL 5000 आणि IOC एकूण 10,000 EV चार्जिंग स्टेशन उभारेल. अनेक रस्ते आणि मार्केटमध्ये चार्जिंग पॉइंट बसवण्याचे कामही सुरू झाले आहे. पेट्रोल पंपांनाही त्यांच्या कॅम्पसमध्ये ई-वाहन चार्जिंग सुविधा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
Electric Scooter Charging चं टेन्शन खल्लास, अवघ्या 5 मिनिटात चार्ज होणार
Oben Rorr Electric Bike साठी बुकिंग सुरु, अवघ्या 999 रुपयांत करा बुकिंग
धमाकेदार ऑफर! साडेचार लाखांची Datsun कार अवघ्या 2.70 लाखात घरी न्या
