मंगळ-गुरु ग्रहांदरम्यानच्या लघुग्रहाला ‘पंडित जसराज’ यांचं नाव

| Updated on: Sep 30, 2019 | 11:10 AM

इंटरनॅशनल अॅस्ट्रोनॉमिकल यूनियन (आयएयू) ने मंगळ आणि गुरु ग्रहांदरम्यान असलेल्या लघुग्रहाला पंडित जसराज यांचं नाव दिलं आहे.

मंगळ-गुरु ग्रहांदरम्यानच्या लघुग्रहाला पंडित जसराज यांचं नाव
Follow us on

मुंबई : शास्त्रीय गायनाने जगभरातील रसिकांना मंत्रमुग्ध करणारे ज्येष्ठ गायक पंडित जसराज (Pandit Jasraj Minor Planet) यांचं नाव आता ब्रम्हांडात दुमदुमणार आहे. मंगळ आणि गुरु ग्रहांच्या दरम्यान सापडलेल्या लघुग्रहाचं ‘पंडित जसराज’ असं नामकरण करण्यात आलं आहे. हा सन्मान लाभलेले ते पहिलेच भारतीय कलाकार आहेत.

इंटरनॅशनल अॅस्ट्रोनॉमिकल यूनियन (आयएयू) ने मंगळ आणि गुरु ग्रहांदरम्यान असलेल्या लघुग्रहाला पंडितजींचं नाव दिलं आहे. 2006 वीपी 32 (क्रमांक – 300128) असं या लघुग्रहाचं वैज्ञानिक नाव (Pandit Jasraj Minor Planet) आहे. 28 जानेवारी 1930 या पंडित जसराज यांच्या जन्मतारखेला उलट लिहून हा क्रमांक देण्यात आला आहे. 11 नोव्हेंबर 2006 रोजी या ग्रहाचा शोध लागला होता.

हा ग्रह मंगळ आणि गुरु ग्रहांच्या कक्षांच्या दरम्यान भ्रमण करतो. अशा लघुग्रहांना ना ग्रहांचा दर्जा देत येत, ना त्यांना धुमकेतू म्हटलं जात.

काँग्रेसची पहिली यादी जाहीर, 51 उमेदवारांची घोषणा

पंडित जसराज यांच्या कन्या आणि गायिका दुर्गा जसराज यांनी या सन्मानाविषयी माहिती दिली आहे. 23 सप्टेंबरला याबाबत अधिकृत घोषणा झाल्याचं दुर्गा म्हणाल्या. भारतीय शास्त्रीय गायनातील ते संगीत मार्तंड असल्याचं यावेळी इंटरनॅशनल अॅस्ट्रोनॉमिकल यूनियनने म्हटलं.

शास्त्रीय गायनासाठी आपलं जीवन व्यतित करणाऱ्या पंडित जसराज यांना अनेक पुरस्कार, सन्मान आणि उपाधी मिळाल्या आहेत. भारत सरकारने त्यांचा ‘पद्मविभूषण’ने गौरव केला आहे. मेवाती घराण्याचे गायक असलेले 89 वर्षीय पंडित जसराज सध्या अमेरिकेत स्थायिक झाले आहेत.

‘ईश्वराच्या असीम कृपेमुळे मला हा सन्मान मिळाला. भारत आणि भारतीय संगीतासाठी हा देवाचा आशीर्वाद आहे’ अशा भावना पंडित जसराज यांनी बोलून दाखवल्या आहेत.