शौचाल्याच्या टाकीचे झाकण उघडे, खेळण्यासाठी गेलेल्या चार वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

| Updated on: Nov 18, 2020 | 2:22 PM

ठेकेदार आणि पालिका अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. (Mira Bhayander four Years Girl Fall in Toilet tank)

शौचाल्याच्या टाकीचे झाकण उघडे, खेळण्यासाठी गेलेल्या चार वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू
Follow us on

मिरा भाईंदर : उड्डाणपुलाखाली शौचालयाच्या टाकीचे झाकण उघडे असल्याने एका चार वर्षीय मुलीचा पडून मृत्यू झाला आहे. अफिफा मुस्तफा अली अन्सारी असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या मुलीच्या मृत्यूच्या जबाबदार असणाऱ्या ठेकेदार आणि पालिका अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. (Mira Bhayander four Years Girl Fall in Toilet tank)

मिरा भाईंदरमधील काशीमिरा उड्डाणपुलाच्या खाली पालिकेचे सुशोभीकरणाचे काम सुरू होते. त्याच ठिकाणी असलेल्या एका शौचालयाच्या टाकीचे झाकण कामादरम्यान उघडे ठेवण्यात आले होते. यावेळी त्या ठिकाणी अफिफा खेळ होती. त्यावेळी खेळण्यासाठी टाकीजवळ गेली असताना झाकण उघडे असल्याने ती त्यात पडली. या दुर्घटनेत तिचा मृत्यू झाला.

आफिफा अन्सारी यांचे मूळ कुटुंब हे मुंबईतील मालाड या परिसरात वास्तव्यास आहे. ती दिवाळीच्या निमित्ताने तिच्या आई-वडिलांसोबत मिरा-भाईंदर या ठिकाणी एका पाहुण्याच्या घरी गेली होती. त्यावेळी ही दुर्घटना घडली.

दरम्यान काशीमिरा पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनसाठी पाठवला आहे. तसेच या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. या दुर्घटनेप्रकरणी जबाबदार असणाऱ्या ठेकेदार आणि पालिका अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. (Mira Bhayander four Years Girl Fall in Toilet tank)

संबंधित बातम्या : 

भाऊ-बहिणीचा अभ्यासाच्या तणावातून आत्महत्येचा प्रयत्न, बहिणीचा मृत्यू

पत्नीच्या मृत्यूनंतर पतीचीही रेल्वेखाली आत्महत्या, फेसबुक लाईव्ह करत जगाचा निरोप