Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

योगायोग पाहा, आमदार रोहित पाटील आणि सुहास बाबर यांची वडीलांप्रमाणे विधानभवनात एकत्र एण्ट्री

महाराष्ट्राच्या नव्या सरकारच्या आमदारांचा आज विधानसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शपथविधी झाला. यावेळी विरोधकांनी शपथविधीवर बहिष्कार टाकला. या वेळी एक अनोखा योगायोग घडून आला आहे.योगायोग पाहा.... आरआर आबा आणि अनिल बाबर यांच्या चिरंजीवांची वडीलांप्रमाणे विधानसभेत एकत्र एण्ट्री केली आहे.

योगायोग पाहा, आमदार रोहित पाटील आणि सुहास बाबर यांची वडीलांप्रमाणे विधानभवनात एकत्र एण्ट्री
mla rohit patil and suhas babar
Follow us
| Updated on: Dec 07, 2024 | 7:27 PM

वडिलांप्रमाणेच मुलांचाही प्रथमच आमदार म्हणून विधानसभेत आज प्रवेश घडल्याचा अनोखा योगायोग जुळून आला. १९९० साली माजी गृहमंत्री आर.आर. पाटील आणि आमदार अनिल बाबर यांनी प्रथमच आमदार म्हणून निवडून येत महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रवेश केला होता. अगदी तसाच प्रकार आज घडला. या उभय लोकप्रतिनिधींचे चिरंजीव आमदार म्हणून निवडून आलेले रोहित पाटील आणि सुहास बाबर यांनी विधानसभेत आज एकत्रच प्रवेश केला. त्यामुळे एका अनोख्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे.

स्वर्गीय आर.आर. पाटील ऊर्फ आबा यांचा पूत्र आणि विधानसभेतील सर्वात तरुण २५ वर्षीय आमदार आणि स्वर्गीय अनिल बाबर यांचा पूत्र सुहास बाबर अुनक्रमे तासगाव आणि खानापूर आटपाडी विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहे.या दोन्ही लोकप्रतिनिधींचा वारसा त्यांचे पूत्र राजकारणात समर्थपणे चालवत आहेत. अनिल बाबर हे शिंदे गटाचे आमदार होते. तर आर.आर. पाटील हे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द गाजली होती. त्यांनी डान्सबार बंदी आणून देशभरात लोकप्रियता मिळविली होती.

हे सुद्धा वाचा

१९९० सालीही एकत्रितच  प्रवेश

स्व. आर. आर. पाटील आबा आणि स्व. अनिलभाऊ बाबर यांनी 1990 मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. तासगाव विधानसभा मतदारसंघातुन आर. आर. पाटील तर खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून अनिल बाबर यांनी निवडणूक लढवून प्रथमच आमदारकीची निवडणूक जिंकली होती. त्यावेळी देखील आर. आर. आणि अनिल बाबर यांनी १९९० साली एकत्रितच विधानभवनामध्ये प्रवेश केला होता. आज त्यांचे वारसदार असलेले नवनिर्वाचित आमदार रोहित पाटील आणि आमदार सुहास बाबर यांनी एकत्रित विधानभवनात प्रवेश केला. या दोघांच्या एकत्रित आगमनानंतर आर. आर. पाटील आणि अनिल बाबर यांची जोडी पुन्हा तरुण होऊन आलीय अशा भावना अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.रोहित पाटील हे तासगाव कवठेमंकाळ मतदार संघातून तर सुहास बाबर हे खानापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून प्रथमच निवडून आलेत.

'तुम्ही कितीही तारीफ करा.. तो फक्त वाट पाहातोय', शिरसाटांचा दावा काय?
'तुम्ही कितीही तारीफ करा.. तो फक्त वाट पाहातोय', शिरसाटांचा दावा काय?.
...असं बोललो नाही, भास्कर जाधवांच्या मनात काय? आधी नाराजी मग सारवासारव
...असं बोललो नाही, भास्कर जाधवांच्या मनात काय? आधी नाराजी मग सारवासारव.
चॉपरने केक कापणं बर्थडे बॉयच्या अंगाशी, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
चॉपरने केक कापणं बर्थडे बॉयच्या अंगाशी, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल.
'संजय राऊत सध्या जोकरच्या भूमिकेत'; भाजपच्या बड्या मंत्र्याची टीका
'संजय राऊत सध्या जोकरच्या भूमिकेत'; भाजपच्या बड्या मंत्र्याची टीका.
'शिवसेना अन् ठाकरेंचा संबंध नाही, एक दिवस असा असेल मातोश्रीत फक्त...'
'शिवसेना अन् ठाकरेंचा संबंध नाही, एक दिवस असा असेल मातोश्रीत फक्त...'.
VIDEO : 'बोललं की माझं तोंड दिसतं', अजितदादांनी बांधकाम विभागाला झापलं
VIDEO : 'बोललं की माझं तोंड दिसतं', अजितदादांनी बांधकाम विभागाला झापलं.
सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार?
सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार?.
नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव म्हणाले, 'पण ही वस्तुस्थिती...'
नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव म्हणाले, 'पण ही वस्तुस्थिती...'.
मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र
मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र.
बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी...
बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी....