आधी मुलाची आत्महत्या, नंतर आईचा हार्ट अटॅकने मृत्यू

Nupur Chilkulwar

| Edited By: |

Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

पिंपंरी-चिंचवड : मनोरुग्ण मुलाने आत्महत्या केल्याचं बघून हृदय विकाराच्या धक्क्याने आईचाही मृत्यू झाल्याची घटना घडली. पिंपरी-चिंचवड येथील पिंपळे सौदागर येथे ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. तन्मय दासगुप्ता आणि त्याची आई शुक्ला दासगुप्ता अशी या माय-लेकांची नावे आहेत. 38 वर्षीय तन्मय हा एक मनोरुग्ण होता. वडिलांचे निधन झाल्यानंतर तन्मय त्याच्या आई शुक्ला (65) यांच्यासोबत […]

आधी मुलाची आत्महत्या, नंतर आईचा हार्ट अटॅकने मृत्यू
Follow us

पिंपंरी-चिंचवड : मनोरुग्ण मुलाने आत्महत्या केल्याचं बघून हृदय विकाराच्या धक्क्याने आईचाही मृत्यू झाल्याची घटना घडली. पिंपरी-चिंचवड येथील पिंपळे सौदागर येथे ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. तन्मय दासगुप्ता आणि त्याची आई शुक्ला दासगुप्ता अशी या माय-लेकांची नावे आहेत.

38 वर्षीय तन्मय हा एक मनोरुग्ण होता. वडिलांचे निधन झाल्यानंतर तन्मय त्याच्या आई शुक्ला (65) यांच्यासोबत पिंपळे सौदागर येथे राहायचा. मनोरुग्ण असल्याने तन्मयने अभियांत्रिकीचे शिक्षण अर्थवट सोडले. तो ठीक व्हावा यासाठी त्याच्यावर उपचारही सुरु होते, मात्र गेल्या दोन महिन्यांपासून तन्मयने औषधं खाणं बंद केलं होतं. त्यामुळे सोमवारी त्याची आई त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेली. रुग्णालयात डॉक्टरांच्या भीतीने तो तिथून पळून आला.

घरी आल्यानंतर रात्री उशिरा त्याने चाकूने स्वत:चा गळा कापण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो यात विफल ठरला. त्यानंतर त्यानं घरातील एक्सटेन्शन बोर्डच्या वायर पंख्याला बांधून गळफास घेत स्वत:चे जीवन संपवले. मात्र, तन्मयच्या ओझ्याने पंख्यासह तो मृतावस्थेतच खाली पडला. तेव्हा त्याच्या आईला जाग आली, आपल्या मुलाला असं निपचित पडलेलं बघून शुक्ला यांना हृदय विकाराचा धक्का बसला आणि त्यांचाही मृत्यू झाला.

सुरुवातीला जेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं, तेव्हा काहीतरी घातपात झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली होती. मात्र, शवविच्छेदानानंतर हृदय विकाराच्या धक्क्याने शुक्ला यांचा मृत्यू झाल्याचे समजले. माय-लेकाच्या मृत्यूने पिंपळे सौदागर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI