LIVE : मनसेची विदर्भात चाचपणी, राज ठाकरेंची प्रचारसभाही होणार?

LIVE : मनसेची विदर्भात चाचपणी, राज ठाकरेंची प्रचारसभाही होणार?

[svt-event title=”काँग्रेस आज 50 उमेदवारांची यादी जाहीर करणार” date=”21/09/2019,10:41AM” class=”svt-cd-green” ] काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होणार, 50 उमेदवारांची पहिली यादी आज येणार, ‘सिटिंग गेटिंग’ या तत्त्वानुसार सर्व आमदारांना काँग्रेस तिकीट देणार, 26 तारखेला काॅंग्रेसची दुसरी यादी,- छाननी समितीचे सदस्य विजय वडेट्टीवार यांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”मनसेकडून विदर्भातील जागांची चाचपणी” date=”21/09/2019,9:28AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : मनसे विदर्भात वणी, हिंगणघाट, अकोला जिल्ह्यातील एक आणि बुलडाणा जिल्ह्यातील जागा लढणार, उद्या विदर्भातील नेत्यांची राज ठाकरे यांनी बैठक बोलावली. राज ठाकरे विदर्भात घेणार प्रचार सभा. मनसे आघाडीत निवडणूक लढवण्याचीही चर्चा सुरु, सूत्रांची माहिती. [/svt-event]

[svt-event title=”काँग्रेसची यादी लांबणीवर” date=”21/09/2019,9:27AM” class=”svt-cd-green” ] काँग्रेसची विधानसभा निवडणुकी संदर्भात येणारी पाहिली यादी लांबणीवर. निवडणूक आयोग जोपर्यंत निवडणुका घोषित करत नाही तोपर्यंत यादी नाही. काँग्रेसची यादी मात्र तयार, सूत्रांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”मनसेकडून अधिकाऱ्याला खड्डे राईड” date=”21/09/2019,9:27AM” class=”svt-cd-green” ] चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील मूल महामार्गाच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्याचा मनसेचा अनोखा प्रयत्न. महामार्ग प्रकल्पाच्या अधिकाऱ्याला दुचाकीवर करवली खड्डे राईड.मनसेचे नगरसेवक सचिन भोयर यांचा अफलातून प्रयत्न. फजितीनंतर अधिकाऱ्याने तातडीने काम सुरु करण्याचे ठेकेदाराला आदेश. चंद्रपूर शहरातून जाणारा मूल रोड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३१ म्हणून घोषित झाला आहे. सावरकर चौक ते MEL पर्यंत रस्त्यावर खड्डे आणि उडणारी धूळ यामुळे दुरावस्था झाली आहे. अशोक मत्ते हे उपविभागीय अधिकारी आहेत राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे ज्यांना ही मनसेतर्फे खड्डे राईड घडविण्यात आली. [/svt-event]

[svt-event title=”नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिरात तयारीला वेग” date=”21/09/2019,9:26AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिरात तयारीला वेग. बुधवारी मुख्य गाभाऱ्याची स्वच्छता होणार. बुधवारी दिवसभर अंबाबाईचे दर्शन राहणार बंद. भाविकांना उत्सवमूर्तीचे दर्शन घेता येणार [/svt-event]

Published On - 9:32 am, Sat, 21 September 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI