जेलरला बंदूक दाखवून पळालेला जळगावचा कुख्यात आरोपी बोईसरमध्ये जेरबंद

जेलरला बंदूक दाखवून पळालेला जळगावचा कुख्यात आरोपी बोईसरमध्ये जेरबंद

जळगाव जेलमधून फरार झालेल्या तीन सराईत गुन्हेगारांमधील एका आरोपीला बोईसर पोलिसांनी अटक केली आहे (Boisar Police arrested accused).

सचिन पाटील

| Edited By:

Sep 06, 2020 | 2:04 PM

जळगाव : जळगाव जेलमधून फरार झालेल्या तीन सराईत गुन्हेगारांमधील एका आरोपीला बोईसर पोलिसांनी अटक केली आहे (Boisar Police arrested accused). आरोपी बोईसर येथील सरावली परिसरात रुंदावन सोसायटीमध्ये 4 दिवसांपासून राहत होता. यावेळी पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. गौरव विजय पाटील असं फरार आरोपीचे नाव आहे (Boisar Police arrested accused).

तीन आरोपी 25 जुलैला जळगाव येथील जेलरला पिस्तुलचा धाक दाखवत तेथून फरार झाले होते. या तिघां आरोपींपैकी कुख्यात आरोपीला पकडण्यात बोईसर पोलिसांनी मोठं यश मिळवलं आहे. पालघर अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

सदर आरोपी सरावली येथील वृंदावन सोसायटीमध्ये राहत असल्याची गुप्त माहिती बोईसर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे आणि कर्मचाऱ्यांनी सरावली येथे सापळा रचून आरोपीला अटक केली.

जळगाव जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्यांमध्ये ही या आरोपीवर हाफ मर्डर, सशस्त्र दरोड्यासह विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपी फरार झाल्यापासून जळगाव पोलीस यांचा शोध घेत होते.

संबंधित बातम्या :

कोरोना काळात रेशनच्या तांदळाचा काळाबाजार, नवी मुंबईतून थेट दक्षिण आफ्रिकेत निर्यात

डी-मार्टच्या वस्तू चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक, 18 लाखांचा मुद्देमाल जप्त, रबाळे एमआयडीसी पोलिसांची कारवाई

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें