मुंबईत लॉकडाऊनमध्ये दुहेरी हत्याकांड, सख्ख्या भावांची हत्या, एक गंभीर

मुंबईच्या रफी अहमद किडवाई मार्ग पोलिस स्टेशनच्या हद्दीत मैदानात बसणे आणि बाईक पार्किंगच्या वादातून दोघा भावांची हत्या करण्यात आली (Mumbai Brothers killed during Lockdown))

मुंबईत लॉकडाऊनमध्ये दुहेरी हत्याकांड, सख्ख्या भावांची हत्या, एक गंभीर


मुंबई : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे गुन्हेगारीत घट होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र मुंबईत लॉकडाऊन असतानाही दुहेरी हत्याकांड घडलं. शिवडीमध्ये दोघा सख्ख्या भावांची हत्या करण्यात आली आहे. (Mumbai Brothers killed during Lockdown)

मुंबईच्या रफी अहमद किडवाई मार्ग पोलिस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला. मैदानात बसणे आणि बाईक पार्किंगच्या वादातून सोमवारी मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती आहे.

हेही वाचा : लॉकडाऊनमध्ये माहेरी जाण्याचा हट्ट, पतीशी वादानंतर विवाहितेची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या

लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर असलेल्या मैदानात बसलेल्या मुलांवर चॉपरने हल्ला करण्यात आला. त्यामध्ये दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृतांपैकी एक मुलगा अल्पवयीन असल्याची माहिती आहे.

चॉपरने हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाला हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्यावर सध्या केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

रफी अहमद किडवाई मार्ग पोलिस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरु आहे.

पाहा व्हिडिओ :

 

(Mumbai Brothers killed during Lockdown)