नगरमधील डॉन बॉस्को शाळेच्या सहलीच्या बसला भीषण अपघात

अहमदनगर/पुणे : शाळेची सहल घेऊन गेलेल्या बसला भीषण अपघात होऊन तीन जणांचा मृत्यू झालाय. नगर-कल्याण महामार्गावर जुन्नर तालुक्यातील गायमुखवाडी फाट्याजवळ ट्रॅव्हल बस आणि मालवाहतूक पीकअप यांचा अपघात झाला. ओतूर आळेफाटा यांच्या दरम्यान हा भीषण अपघात झाला असून या अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती, की अपघातानंतर दोन्ही वाहनांनी जागेवरच पेट घेतला. मालवाहू पीकअप आळेफाट्याकडून ओतूरच्या दिशेने […]

नगरमधील डॉन बॉस्को शाळेच्या सहलीच्या बसला भीषण अपघात
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:39 PM

अहमदनगर/पुणे : शाळेची सहल घेऊन गेलेल्या बसला भीषण अपघात होऊन तीन जणांचा मृत्यू झालाय. नगर-कल्याण महामार्गावर जुन्नर तालुक्यातील गायमुखवाडी फाट्याजवळ ट्रॅव्हल बस आणि मालवाहतूक पीकअप यांचा अपघात झाला. ओतूर आळेफाटा यांच्या दरम्यान हा भीषण अपघात झाला असून या अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती, की अपघातानंतर दोन्ही वाहनांनी जागेवरच पेट घेतला.

मालवाहू पीकअप आळेफाट्याकडून ओतूरच्या दिशेने चालला होता, तर ट्रॅव्हल बस मुंबईकडून कल्याणच्या दिशेने जात असताना गायमुखवाडी फाट्याजवळ समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. खाजगी ट्रॅव्हलस बसमध्ये डॉन बॉस्को विद्यालय, सावेडी अहमदनगर येथील नववी ते बारावीच्या वर्गातील विद्यार्थी होते. हे विद्यार्थी सहलीसाठी मुंबईला गेलेले होते. मुंबईहून नगरकडे परतत असताना हा अपघात झाला.

या अपघातात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ट्रॅव्हल बसचा क्लीनर शैलेश निमसे (वय 19), तर पीकअप वाहनातील चालक महादेव खोसे यांचा मृत्यू झाला.

अपघातात 40 ते 45 विद्यार्थी हे किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर आळेफाटा येथील विविध खाजगी रुग्णालयात उपचार करून त्यांना सोडून देण्यात आलं. या अपघातानंतर तातडीने ओतूर पोलीस आणि आळेफाटा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दोन्ही अपघातग्रस्त वाहने ही जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.

दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर.
दिल्लीत कांटे की टक्कर, आपचे तीन मोठे चेहरे पिछाडीवर
दिल्लीत कांटे की टक्कर, आपचे तीन मोठे चेहरे पिछाडीवर.
बीडचे SP कॉवत ॲक्शन मोडवर, पोलीस अधीक्षकांची 80 जणांना तंबी, कारण काय?
बीडचे SP कॉवत ॲक्शन मोडवर, पोलीस अधीक्षकांची 80 जणांना तंबी, कारण काय?.
तब्बल 'इतक्या' लाख लाडक्या बहिणी अपात्र, आदिती तटकरेंनी थेट दिला आकडा
तब्बल 'इतक्या' लाख लाडक्या बहिणी अपात्र, आदिती तटकरेंनी थेट दिला आकडा.
कोर्टाचा निर्णय येताच दमानियांची मोठी मागणी, करूणा शर्मांना तातडीने...
कोर्टाचा निर्णय येताच दमानियांची मोठी मागणी, करूणा शर्मांना तातडीने....
लोकलमधून उतरताना ओढणी दुसऱ्याच्या बॅगेत अडकली अन्..., बघा CCTV फुटेज
लोकलमधून उतरताना ओढणी दुसऱ्याच्या बॅगेत अडकली अन्..., बघा CCTV फुटेज.
'त्या काय मला न्याय देणार?' शर्मांची महिला आयोगाच्या अध्यक्षांवर टीका
'त्या काय मला न्याय देणार?' शर्मांची महिला आयोगाच्या अध्यक्षांवर टीका.
'हा निवडणूक आयोगाचा खेळ... इतके मतदार कसे वाढले?', राहुल गांधींचा सवाल
'हा निवडणूक आयोगाचा खेळ... इतके मतदार कसे वाढले?', राहुल गांधींचा सवाल.
'बिबट्या माणसाला मारतो, आम्हालाही बिबट्याला मारू द्या'- सुजय विखे
'बिबट्या माणसाला मारतो, आम्हालाही बिबट्याला मारू द्या'- सुजय विखे.
'कुणी तरी पुडी सोडली पण आम्ही 100%...', ठाकरेंच्या 9 खासदारांची कबुली
'कुणी तरी पुडी सोडली पण आम्ही 100%...', ठाकरेंच्या 9 खासदारांची कबुली.