नागपुरातील वाढत्या कोरोनावरुन आयुक्तांकडे बोट, आता तुकाराम मुंढेंचं महापौरांना उत्तर

| Updated on: Apr 21, 2020 | 5:52 PM

आपण सगळं काम नियमाला धरून करत आहे, त्यामुळे अशा प्रकारचे आरोप करणं चुकीचं आहे, असे तुकाराम मुंढे (Nagpur Commissioner Tukaram Mundhe on Mayor Sandeep Joshi) म्हणाले.

नागपुरातील वाढत्या कोरोनावरुन आयुक्तांकडे बोट, आता तुकाराम मुंढेंचं महापौरांना उत्तर
Follow us on

नागपूर : नागपुरात ‘कोरोना’बधित रुग्णांचा आकडा दररोज वाढताना दिसत (Nagpur Commissioner Tukaram Mundhe on Mayor Sandeep Joshi) आहे. यासाठी महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी केला आहे. या आरोपावर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आपण सगळं काम नियमाला धरून करत आहे, त्यामुळे अशा प्रकारचे आरोप करणं चुकीचं आहे, असे तुकाराम मुंढे म्हणाले.

“केंद्र आण राज्य सरकारच्या गाईडलाईन्सला धरुन (Nagpur Commissioner Tukaram Mundhe on Mayor Sandeep Joshi) काम सुरु आहे. एखाद्या संशंयिताला क्वारंटाईन केल्यानंतर शक्यतो एका रुममध्ये ठेवलं जातं. जर दोन व्यक्ती असतील तर त्या ठिकाणी नियमानुसार अंतर पाळलं जातं. त्यांच्या जेवणाची आणि इतर सगळी सोय केली जाते,” असे तुकाराम मुंढे यांनी म्हटलं आहे.

“तसेच सगळ्या विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी लक्ष ठेऊन असतात. एकदा काही लोकांनी एकत्रित येण्याचा प्रयत्न केला होता, मात्र आपण ते होऊ दिलं नाही. क्वारंटाईन ठेवलेल्या व्यक्तीपासून इतरांना कोरोनाचा फैलाव होऊ नये हा त्यामागचा उद्देश आहे,” असेही तुकाराम मुंढे म्हणाले.

हेही वाचा :  नागपुरात वाढत्या ‘कोरोना’ रुग्णसंख्येला महापालिका प्रशासन जबाबदार, महापौरांचा आरोप

“नागपुरात एका व्यक्तीमुळे 40 लोकांना लागण झाली होती. त्यांना आधीच क्वारंटाईन ठेवलं नसतं तर फैलाव मोठ्या प्रमाणात झाला असता, आपण सगळं काम नियमाला धरून करत आहे. त्यामुळे अशा प्रकारचे आरोप करणं चुकीचं आहे,” असेही तुकाराम मुंढे म्हणाले.

महापौरांचे आरोप काय?

“नागपूरच्या आमदार निवास आणि इतर ठिकाणी कोरोना संशयितांना एकत्र क्वारंटाइन करुन ठेवलं जात आहे. यातील अनेक जण एकत्रितपणे वावरत आहेत. ज्यावेळी तपासणी अहवाल येतो, त्यावेळी यातील काहींचा अहवाल पॉझिटिव्ह येतो. मात्र तोपर्यंत त्यांनी इतरांनाही संसर्ग केलेला असतो’ असा दावा महापौर संदीप जोशी यांनी केला आहे.

आधी तपासणी करुन जे रुग्ण ‘कोरोना’ पॉझिटिव्ह येत आहेत, त्यांच्यावर उपचार करावेत, आणि जे निगेटिव्ह येत आहेत त्यांना क्वारंटाइन करुन ठेवावं. हे करताना ज्यांना अधिक लक्षणं आहेत, त्यांना लाल आणि ज्यांना लक्षणं नाही त्यांना हिरवा टॅग लावा’ असंही नागपूरच्या महापौरांनी सुचवलं आहे.

जर कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आणखी वाढला, तर याला सर्वस्वी महापालिका प्रशासन जबाबदार राहील,” असा इशाराही महापौर (Nagpur Commissioner Tukaram Mundhe on Mayor Sandeep Joshi) यांनी दिला.