पुण्यात दोन पोलिसांना कोरोनाची लागण, दादर पोलीस वसाहतीतही कोरोनाचा शिरकाव

पुणे पोलीस दलातील दोन दिवसांपूर्वी एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची (Pune Police Tested Corona Positive) लागण झाली होती.

पुण्यात दोन पोलिसांना कोरोनाची लागण, दादर पोलीस वसाहतीतही कोरोनाचा शिरकाव

पुणे : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला (Pune Police Corona Positive) आहे. मुंबई, पुण्यातील दाटीवाटीच्या भागात कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यानंतर आता अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. नुकतंच पुणे पोलीस दलातील आणखी दोघांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर दुसरीकडे मुंबईतील दादर पोलीस वसाहतीत राहणाऱ्या एक पोलिसाला कोरोना झाला आहे.

पुणे पोलीस दलातील दोन दिवसांपूर्वी एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची (Pune Police Corona Positive) लागण झाली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या 14 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आलं होतं. या सर्वांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पुणे पोलीस दलातील तीन कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोरोना झाला आहे.

तर दुसरीकडे मुंबईतील दादर परिसरातील पोलीस वसाहतीतही कोरोनाने शिरकाव केला आहे. या वसाहतीतील एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. या व्यक्तीला 14 एप्रिलपासून ताप येत होता. त्यानंतर त्याची स्वॅब टेस्ट घेतली असता, त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

यानंतर या पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील तिघांना सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हा पोलीस कर्मचारी वरळी कोळीवाडा या ठिकाणी ड्युटीला होता.

यानंतर इमारतीचा पहिला मजला क्वारंटाईन करण्यात आला आहे. तसेच महापालिकेच्या आरोग्य पथकातर्फे इमारतीत निर्जंतुकीकरण फवारणी केली आहे.

राज्यातील 37 पोलिसांना कोरोना

दरम्यान राज्यातील कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या 37 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. यात 8 अधिकारी आणि 29 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 23 मार्चपासून 17 एप्रिलपर्यंत 37 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोरोनाची लागण झालेल्या सर्व अधिकाऱ्यांमध्ये मुंबईत आणि ठाण्यातील पोलिसांची संख्या जास्त आहे. जवळपास 37 पैकी 19 पोलीस हे मुंबई आणि ठाण्यातील  (Pune Police Corona Positive)  आहेत.

संबंधित बातम्या : 

CISF च्या जवानांनी कोरोनाला गाडलं, 6 जवान कोरोनामुक्त, पनवेलमध्ये 10 जणांना डिस्चार्ज

Pune Corona Update : पुण्यात ससून, भारती आणि नायडू रुग्णालयातील सर्व आयसोलेशन बेड फुल्ल

Published On - 3:58 pm, Tue, 21 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI