राज्यातील 37 पोलिसांना कोरोना, मुंबई-ठाण्यातील सर्वाधिक पोलिसांना संसर्ग

राज्यातील कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या 37 पोलिसांना कोरोनाची बाधा (Corona virus maharashtra police) झाली आहे.

राज्यातील 37 पोलिसांना कोरोना, मुंबई-ठाण्यातील सर्वाधिक पोलिसांना संसर्ग

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला (Corona virus maharashtra police)आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. पोलीस अधिकारी आणि इतर कर्मचारीही 24 तास कार्यरत आहे. या संकटाशी मुकाबला करणाऱ्या 8 पोलीस अधिकारी आणि 29 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दुसरीकडे मुंबईतील भारतीय नौदलाच्या 20 कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

राज्यातील कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या 37 पोलिसांना कोरोनाची बाधा (Corona virus maharashtra police) झाली आहे. यात 8 अधिकारी आणि 29 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 23 मार्चपासून 17 एप्रिलपर्यंत 37 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोरोनाची लागण झालेल्या सर्व अधिकाऱ्यांमध्ये मुंबईत आणि ठाण्यातील पोलिसांची संख्या जास्त आहे. जवळपास 37 पैकी 19 पोलीस हे मुंबई आणि ठाण्यातील आहेत.

त्याशिवाय पुण्यातील एका पोलीस कर्मचारी आणि त्याच्या पत्नीला कोरोना झाला आहे. हे पोलीस कर्मचारी पुणे शहराच्या मध्यवस्तीतील ठाण्यात कार्यरत आहे. कोरोनाबाधित कर्मचारी पोलीस हे वाहन चालक आहेत. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील इतर कर्मचाऱ्यांचा शोध सुरू करण्यात आल्याची माहिती सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी दिली आहे.

भारतीय नौदलातही कोरोनाचा शिरकाव

तर दुसरीकडे कोरोनाने भारतीय नौदलातही शिरकाव केला आहे. मुंबईत भारतीय नौदलाच्या 20 कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. कोरोना संसर्ग झालेल्या सैनिकांवर उपचार सुरु आहेत.

कोरोना संसर्ग झालेल्या नौदल सैनिकांच्या संपर्कात आलेल्या इतरांचाही शोध घेतला जात आहे. त्यांच्याही कोरोना चाचणी घेतल्या जाणार आहेत. 7 एप्रिलला नौदलाचा एक सैनिक कोरोना पॉझिटिव्ह आढळला. यानंतर त्याच्यासोबत राहणाऱ्या आणि संपर्कात आलेल्या नौदलाच्या इतरांची तपासणी करण्यात आली. यात हे 20 सैनिक कोरोना बाधित असल्याचं स्पष्ट झालं. या सर्वांना अद्याप कोरोनाची कोणतीही लक्षणं दिसलेली (Corona virus maharashtra police) नाहीत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *