Pune Corona Update : पुण्यात ससून, भारती आणि नायडू रुग्णालयातील सर्व आयसोलेशन बेड फुल्ल

पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे ससून, नायडू आणि भारती रुग्णालयांमधील सर्व आयसोलेशन बेड फुल्ल झाले आहेत (Pune Corona Update).

Pune Corona Update : पुण्यात ससून, भारती आणि नायडू रुग्णालयातील सर्व आयसोलेशन बेड फुल्ल
Follow us
| Updated on: Apr 21, 2020 | 1:44 PM

पुणे : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे (Pune Corona Update). मुंबई आणि पुणे हे कोरोनाचे मोठे हॉटस्पॉट ठरत आहेत. पुण्यात आता कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे ससून, नायडू आणि भारती रुग्णालयांमधील सर्व आयसोलेशन बेड फुल्ल झाले आहेत. त्यामुळे पुणे महापालिका प्रशासन आता काही खाजगी रुग्णालयांच्या शोधात आहे (Pune Corona Update).

सध्या ससूनमध्ये 100, नायडूत 120 आणि भारती रुग्णालयात 135 बेड्सची व्यवस्था आहे. मात्र, कोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्यामुळे रुगणालयांमधील बेड्स कमी पडत आहेत. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. खासगी रुग्णालये मिळाले नाहीत तर प्रशासनाकडून वसतिगृहही ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरु आहेत.

राज्यात कोरोनाबाधितांच्या आकड्याने 4 हजारचा टप्पा ओलंडला आहे. तर एकट्या पुण्यात कोरोनाचे 663 रुग्ण आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 20 एप्रिलपासून संपूर्ण पुणे शहर पूर्णपणे सील करण्यात आलं आहे. पुढील सात दिवस पुणे शहरात कडक कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

पुण्यात कोरोना रुग्ण सातत्याने वाढत आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिका क्षेत्र हे संक्रमणशील म्हणून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या काळात फक्त जीवनावश्यक सेवा म्हणजे आरोग्य विषयक, कायदा आणि सुव्यवस्था राखणे, महापालिका आणि शासकीय सेवा सुरु राहतील, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, कोरोनाचे रुग्ण आढळलेल्या पुणे जिल्ह्यातील 5 तालुक्यातील एकूण 27 गावं प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी त्यासंबंधीचे आदेश काढले. त्यामुळे जिल्ह्यातील या 5 तालुक्यातील ही 27 गावे आता पूर्णपणे सील करण्यात आली आहेत.

सील करण्यात आलेली गावे पुढीलप्रमाणे –

  • बारामती नगरपरिषद – संपूर्ण बारामती नगरपरिषद हद्द
  • हवेली तालुका – जांभूळवाडी, वाघोली, आव्हाळवाडी, बावडी, केसनंद, नांदेड, खडकवासला, किरकटवाडी, सोनापूर, मालखेड, वरदाडे, जांभूळवाडी, कोळेवाडी, कोल्हेवाडी, नर्हे, खानापूर, लोणीकंद, उरुळीकांचन, पिसोळी, वडाचीवाडी, हांडेवाडी
  • शिरुर तालुका- विठ्ठलवाडी, शिक्रापूर
  • वेल्हा तालुका – निगडे , मोसे
  • भोर तालुका – नेरे
  • जुन्नर तालुका – डिंगोरे

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 4666 पार

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. काल (20 एप्रिल) महाराष्ट्रात नव्या 466 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्याचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत आज 308 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा 4 हजार 666 वर पोहोचला आहे. देशाची राजधानी असलेल्या मुंबईत आज 308 नव्या रुग्णांची रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. मुंबईतील धारावी परिसरात 30 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे धारावी परिसरात कोरोनाग्रस्तांची संख्या ही 168 वर पोहोचली आहे. तर दादरमध्ये 2 नवे कोरोना रुग्ण आढळले आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 3 हजार 032 वर पोहोचला आहे.

संबंधित बातम्या :

Palghar mob lynching : पालघरप्रकरणी राजकारण नको, सर्व आरोपी अटकेत : शरद पवार

उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उनची प्रकृती चिंताजनक, अमेरिकन वृत्तपत्रांचा दावा

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.