Corona : नागपुरात कोरोनाचा विळखा घट्ट, 17 नवे रुग्ण, आकडा 124 वर

| Updated on: Apr 26, 2020 | 10:17 AM

नागपुरात शनिवारी दिवसभरात 19 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे नागपुरातील कोरोनाबाधितांची संख्या 124 झाली आहे.

Corona : नागपुरात कोरोनाचा विळखा घट्ट, 17 नवे रुग्ण, आकडा 124 वर
Follow us on

नागपूर : राज्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट (Nagpur Corona Update) होताना दिसत आहे. काल राज्यात एकूण 811 कोरोना रुग्णांची वाढ झाली. तर नागपुरातही काल रात्री 17 रुग्णांचे कोविड-19 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता प्रशासनाची चिंता वाढू (Nagpur Corona Update) लागली आहे.

नागपुरात शनिवारी दिवसभरात 19 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे नागपुरातील कोरोनाबाधितांची संख्या 124 झाली आहे. नागपुरात रुग्ण वाढत असले तरी कोरोना नमुने निगेटिव्ह येण्याचे प्रमाणही मोठे आहे.

नागपुरात 25 एप्रिलपर्यंत विदर्भातून आलेल्या एकूण 2043 नमुन्यांमधून तब्बल 1836 नमुने निगेटिव्ह आले आहेत. ही बाब आरोग्य यंत्रणेला दिलासा देणारी आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या (मेयो) विषाणू निदान प्रयोगशाळेत काल पहिल्या फेरीत 30 नमुने तपासण्यात आले. यात सतरंजीपुरा येथील 24 वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आढळून आला. पाच दिवसांपूर्वी या रुग्णाला संशयित म्हणून वनामती येथे दाखल करण्यात आले होते. तर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) प्रयोगशाळेने 55 नमुने तपासले (Nagpur Corona Update).

नव्याने वाढ झालेल्या 19 रुग्णांमध्ये तब्बल 17 रुग्ण हे वानाडोंगरी क्वारंटाईन केंद्रातील आहेत. या रुग्णांमुळे आता नागपुरात रुग्णांची संख्या 124 वर पोहोचली आहे. यातील 22 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

2043 नमुन्यांची तपासणी

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन आता दीड महिन्याच्यावर कालावधी होत आहे. परंतु विदर्भात नागपूरसह अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम आणि गोंदिया या सातच जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. या जिल्ह्यामधून आलेल्या नमुन्यांची तपासणी नागपुरातील मेयो, मेडिकल, एम्स, नीरी आणि माफसू विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत होत आहे. आतापर्यंत येथे एकूण 2043 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून 207 पॉझिटिव्ह रुग्ण वगळात 1836 नमुने निगेटिव्ह आले आहेत.

राज्यातील स्थिती काय?

राज्यात काल (25 एप्रिल) तब्बल 811 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 7 हजार 628 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे काल दिवसभरात 22 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोना बळींची संख्या 323 वर पोहोचली आहे. राज्यात काल 119 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत राज्यात 1 हजार 76 रुग्णांनी कोरोनावर मात  (Nagpur Corona Update) केली आहे.

संबंधित बातम्या :

कोरोनाचा कहर, राज्यात दिवसभरात तब्बल 811 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 7,628 वर

पुण्यातील विळखा आणखी घट्ट, 90 नव्या कोरोना रुग्णांची भर, एकूण आकडा हजार पार

Pune Corona : पुण्यात कोरोनाचं मृत्यूचक्र सुरुच, 24 तासात दोघांचा मृत्यू, आकडा 66 वर