‘त्या’ एका रुग्णामुळे 235 जणांना कोरोना होण्याची भीती : तुकाराम मुंढे

'त्या' एका रुग्णामुळे 235 जणांना कोरोना होण्याची भीती : तुकाराम मुंढे

नागपुरात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे (Tukaram Mundhe on Nagpur Corona).

चेतन पाटील

|

Apr 25, 2020 | 5:42 PM

नागपूर : नागपुरात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे (Tukaram Mundhe on Nagpur Corona). सतरंजीपुरा परिसरातील मृत कोरोनाबाधित रुग्णामुळे नागपुरात कोरोनाचा विळखा वाढला. या रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे आतापर्यंत 55 पेक्षाही अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय सतरंजीपुराच्या त्या एका रुग्णामुळे 235 पेक्षाही जास्त नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली आहे, असं नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितलं (Tukaram Mundhe on Nagpur Corona).

“मनपा प्रशासनाने आपल्यावतीने सतरंजीपुरा भागातील 30 घरांमध्ये राहणाऱ्या 150 नागरिकांना विलगीकरण कक्षात पाठवलं आहे. लोक नीट माहिती देत नाही किंवा प्रशासनाची दिशाभूल करत असल्यामुळे या कामात अडचण निर्माण होत आहे. नागपूरच्या आरोग्यासाठी लोकांनी खरी माहिती द्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं”, असं आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलं.

“कळमना क्षेत्राच्या एका गोदामामध्ये लपून बसलेल्या 12 नागरिकांना मनपाच्या चमूने पोलिस विभागाच्या मदतीने पकडून त्यांना आमदार निवासाच्या विलगीकरण कक्षात पाठविण्यात आलं आहे. जर त्यांनी सहकार्य केलं नाही तर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा लागेल. नागरिकांनी नागपूरला कोरोनामुक्त करण्यासाठी सहकार्य करावं”, असं तुकाराम मुंढे म्हणाले.

नागपूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नागपुरातील कोरोना रुग्णांची संख्या 100 पेक्षाही जास्त झाली आहे. गेल्या चार दिवसात शहरात 18 पेक्षाही जास्त रुग्ण आढळले आहेत.

नागपुरातील सतरंजीपुरा हा परिसर विदर्भातील कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरला आहे. या परिसरातील एका 68 वर्षीय कोरोना रुग्णाचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. त्या मृत रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 55 पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. म्हणजे एका व्यक्तीमुळे नागपूर शहरात कोरोना रुग्णांचा आकडा दुप्पटीने वाढला आहे.

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना नागपूरमध्ये सुरुवातीच्या काळात कोरोना रुग्णांचा आकडा स्थिर होता. काही कंटेनमेंट झोनमध्ये 14 दिवसात नवे रुग्ण न आढळल्याने पालिकेतर्फे पाच कंटेनमेंट झोन बंद करण्यात आले. मात्र सतरंजीपुरा परिसरातील मृत कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्याने नागपुरातील कोरोनाची साखळी वाढली. या एका रुग्णापासून तब्बल 55 पेक्षा अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे नागपूरला कोरोनामुक्त करायचं असेल तर ही साखळी तोडणं गरजेचं आहे.

संबंधित बातम्या :

Pune Corona : पुण्यात कोरोनाचं मृत्यूचक्र सुरुच, 24 तासात दोघांचा मृत्यू, आकडा 66 वर

मातोश्री’च्या अंगणातील चहावाल्याची कोरोनावर मात, ठाकरे परिवाराचे आभार

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें