राष्ट्रीय एकतेवर मराठी, हिंदी, उर्दू मुशायरा, नागपुरात ‘गझलबहार’चं आयोजन

नागपुरातील गझलप्रेमी रसिकांसाठी पर्वणी असणाऱ्या ‘गझलबहार’ (Nagpur Gazalbahar) या मुशायऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.

राष्ट्रीय एकतेवर मराठी, हिंदी, उर्दू मुशायरा, नागपुरात ‘गझलबहार’चं आयोजन

नागपूर : नागपुरातील गझलप्रेमी रसिकांसाठी पर्वणी असणाऱ्या ‘गझलबहार’ (Nagpur Gazalbahar) या मुशायऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी मराठी-हिंदी-उर्दू मुशायऱ्याचं आयोजन येत्या 7 मार्चला करण्यात आलं आहे. हिंदी मोरभवनच्या अर्पण सभागृहात 5:30 वाजता हा मुशायरा सुरु होणार आहे. हा सर्वांसाठी निःशुल्क मुशायरा आहे. (Nagpur Gazalbahar)

गझलप्रेमी रसिकांसाठी पर्वणी असणाऱ्या ‘गझलबहार’ (Nagpur Gazalbaharया मुशायऱ्यात, अनेक दिग्गज गझलकारांचा सहभाग हेच या मुशायऱ्याचं खास आकर्षण आहे. गझलकार अजीजखान पठाण, अनंत नांदूरकर, डॉ. समीर कबीर, किरण काशिनाथ, चित्रा कहाते, धनश्री पाटील आणि शिरीष नाईक यांचा सहभाग आहे.

राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी या गझलबहारचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ उर्दू शायर हमीद अंसारी असणार आहे, तर या गझलबहारचे मुख्य अतिथी म्हणून ‘टीव्ही 9 मराठी’चे नागपूर ब्युरो चीफ गजानन उमाटे आहेत. डॉ. गणेश चव्हाण यांच्या हस्ते गझलबहारचं उद्घाटन होणार आहे. वृंदा ठाकरे आणि देवदत्त संगेत विशेष अतिथी असतील. नागपुरातील जास्तीत जास्त गझलप्रेमी रसिकांनी गझलबहार कार्यक्रमात उपस्थित रहावं, असं आवाहन आयोजकांनी केलं आहे.

Published On - 8:30 am, Thu, 5 March 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI