रणवीरच्या ट्वीटला नागपूर पोलिसांचं भन्नाट उत्तर

| Updated on: Nov 07, 2019 | 12:49 PM

रणवीरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर वोगच्या फोटोशूटमधील लॅण्डलाईन फोनवर बोलतानाच्या पोजमधील एक फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये रणवीर रेट्रो लूकमध्ये दिसतो आहे.

रणवीरच्या ट्वीटला नागपूर पोलिसांचं भन्नाट उत्तर
Follow us on

मुंबई : “व्हॉट इज मोबाईल नंबर, व्हॉट इज युअर स्माईल नंबर”… अभिनेता गोविंदा आणि अभिनेत्री करिश्मा कपूरचं हे 90 च्या दशकातील गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे (What is mobile number). 1999 मध्ये आलेल्या ‘हसिना मान जायेगी’ या सिनेमातील हे गाणं आहे. 10 वर्षांनंतर हे गाणं आज पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलं आहे आणि तेही अभिनेता रणवीर सिंगमुळे (Ranveer Singh Tweet).

रणवीर सिंग हे नावंही ऐकलं तरी डोळ्यासमोर विचित्र, रंगीबेरंगी कपडे, उत्साहाने भरलेला रणवीर आपसूकच उभा राहतो. नेहमी आपल्या कपड्यांच्या स्टाईलमुळे, उत्साहामुळे तो गर्दीतही वेगळा दिसतो. रणवीर सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह राहतो. कधी पत्नी दीपिकाच्या फोटोवर कमेंट करतो, तर कधी स्वत:चे अतरंगी कपड्यांमधील फोटो पोस्ट करत असतो. असाच एक फोटो रणवीरने नुकताच ट्वीट केला. मात्र, या ट्वीटवरुन रणवीर नाही तर नागपूर पोलीस लोकप्रिय झाले (Nagpur Police Tweet).

रणवीरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर वोगच्या फोटोशूटमधील लॅण्डलाईन फोनवर बोलतानाच्या पोजमधील एक फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये रणवीर रेट्रो लूकमध्ये दिसतो आहे. या फोटोत रणवीरने पांढरा शर्ट, पांढऱ्या रंगाची बेल बॉटम पॅण्ट आणि गळ्यात स्कार्फ घातला आहे आणि तो लाल रंगाचा लॅण्डलाईन फोन हातात घेऊन उभा आहे. या फोटोला रणवीरने ‘वॉट इज मोबाईल नंबर? वॉट इज यूअर स्माईल नंबर?, वॉट इज यूअर स्टाईल नंबर? करु क्या डायल नंबर?’ असं कॅप्शन दिलं.

हेही वाचा : ‘विक्रम, लवकर उत्तर दे… पावती फाडणार नाही’

रणवीरच्या या ट्वीटला त्याच्या अनेक चाहत्यांनी रिट्वीट केलं, कमेंट केल्या. मात्र, त्याच्या या ट्वीटवर नागपूर पोलिसांनी दिलेलं उत्तर त्याच्या ट्वीटपेक्षाही जास्त व्हायरल झालं.

नागपूर पोलिसांनी रणवीरचं हे ट्वीट रिट्वीट करत त्याला ‘100’ असं उत्तर दिलं. 100 डायल करा, म्हणजेच पोलिसांचा नंबर डायल करा, असं नागपूर पोलिसांनी त्यांच्या भन्नाट पद्धतीने सांगितलं आहे.

रणवीरच्या ट्वीटला आतापर्यंत 1100 पेक्षा जास्त रिट्वीट मिळाले आहे. तर नागपूर पोलिसांच्या ट्वीटला आतापर्यंत 4 हजाराहून जास्त रिट्वीट मिळाले आहेत. नागपूर पोलिसांचं हे ट्वीट व्हायरल झालं आहे. यावर नेटकरी अनेक मजेशीर कमेंट करत आहेत. नागपूर पोलिसांच्या ट्विटर हँडलवरुन नेहमीच अशाप्रकारचे ट्वीट केले जातात. यापूर्वी चंद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडरविषयीही नागपूर पोलिसांनी केलेलं ट्वीट व्हायरल झालं होतं.