नागपुरातील शाळांकडून पालकांना फी भरण्यास; पुस्तक खरेदीसाठी सक्ती, पालकांकडून आंदोलनाचा इशारा

काही नामांकित शाळेकडून पालकांना शाळेची फी भरण्यासाठी मॅसेज येत आहेत. तसेच पुस्तक खरेदी करण्याची सक्ती केली (Nagpur School Forced to Pay Fees) जात आहे.

नागपुरातील शाळांकडून पालकांना फी भरण्यास; पुस्तक खरेदीसाठी सक्ती, पालकांकडून आंदोलनाचा इशारा
| Updated on: Jun 02, 2020 | 12:08 PM

नागपूर : राज्यात कोरोनाचं संकट असताना कोणत्याही शाळेने पालकांकडून फी मागू (Nagpur School Forced to Pay Fees) नये. तसेच फीसाठी कुठल्याही प्रकारचा दबाव आणू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. मात्र तरीही नागपुरातील काही नामांकित शाळेकडून पालकांना शाळेची फी भरण्यासाठी मॅसेज येत आहेत. तसेच पुस्तक खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या भूमिकेला पालकांनी विरोध करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जवळपास सर्वच शाळा, महाविद्यालयांसह शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय शालेय शिक्षण विभागाने पत्र काढून शाळांनी कुठल्याही पालकाकडून शैक्षणिक शुल्कासह इतर शुल्क घेऊ नये असे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. या निर्देशाविरोधात जाणाऱ्या शाळा किंवा शैक्षणिक संस्थांवर कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशात म्हटलं आहे.

मात्र सरकारच्या या पत्राला न जुमानता काही शैक्षणिक संस्थांनी शुल्क भरण्याचे संदेश पाठविण्यास सुरू केले आहेत. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे.

काही सीबीएसई शाळांकडून पुस्तक आणि स्टेशनरी खरेदी करण्यासाठी पालकांना संदेश पाठवले जात आहे. मात्र काही जागरुक पालक परिषदेनं शाळांच्या या भूमिकेला विरोध केला आहे. तसेच शाळांनी फी आणि पुस्तकांसाठी आग्रह केल्यास आंदोलनाचा इशाराही पालकांनी दिला (Nagpur School Forced to Pay Fees) आहे.

संबंधित बातम्या : 

पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा, शासन निर्णय जारी, अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने होणार

फेलोशिप मंजूर करा, अन्यथा रस्त्यावर उतरु, विद्यार्थ्यांचा धनंजय मुंडेंना अल्टिमेटम

गुणांची सरासरी काढून निकाल, पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना ठाकरे सरकारचा दिलासा