बुलेटला फॅन्सी नंबर प्लेट, पोलिसांकडून मोठा दंड, दंडाची रक्कम…

मोटार वाहन कायदा-1988 आणि मोटार वाहन नियम-1989 नुसार वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावणे अवैध आहेत. तरीही शहरात असंख्य वाहनचालकांची भाईगिरी सुरू आहे.

बुलेटला फॅन्सी नंबर प्लेट, पोलिसांकडून मोठा दंड, दंडाची रक्कम...

नागपूर : नागपुरात फॅन्सी नंबरप्लेट लावणाऱ्या एका बुलेट चालकाला पोलिसांनी चक्क 10 हजार 300 रुपयांचा दंड ठोठावला आहे (Traffic Rules). हा बुलेट चालक नियमांचं उल्लंघन करत असल्याची तक्रारी वाहतूक पोलिसांना अनेकदा मिळाली, त्यानंतर पोलिसांनी ही बंपर कारवाई केली (Fancy Number Plate On Bullet).

“आदत बुरी नहीं हैं, बस शौक थोडे उचें हैं” अशा आशयाची नंबर प्लेट लावून मिरवणाऱ्या वाहन चालकावर पोलीस उपायुक्तांनी चक्क 10 हजार 300 रुपयांचा दंड ठोठावला आहे. पोलिसांनी ज्यावेळी या गाडीचे अवलोकन केले, त्यानंतर वाहन चालकाने कोणते-कोणते नियम मोडले आणि याचा दंड किती होईल याचा हिशोब केला. तेव्हा दंडाची रक्कम चक्क 10 हजार 300 रुपयांपर्यंत जाऊन पोहचली. या वाहन चालकाला जुन्या मोटार वाहन कायद्या प्रमाणे दंड करण्यात आला आहे. नवा कायदा सध्यातरी महाराष्ट्रात लागू झालेला नासल्याने दंडाची रक्कम 10 हजार 300 रुपयांवर निवली, अन्यथा ही रक्कम किती तरी पटीने वाढली असती.

फॅन्सी नंबर प्लेट लावणे अवैध

मोटार वाहन कायदा-1988 आणि मोटार वाहन नियम-1989 नुसार वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावणे अवैध आहेत. तरीही शहरात असंख्य वाहनचालकांची भाईगिरी सुरू आहे. गुन्हेगारी कारवायांमध्ये वापरण्यात येणाऱ्या वाहनांची ओळख पटू नये म्हणून फॅन्सी नंबर प्लेट लावल्या जातात.

स्वतः आणि गाडीची ओळख लपवण्यासाठी गाडीच्या क्रमांकाला आई, भाईचा आकार देणाऱ्या वाहनचालकांचा सुळसुळाट शहरात वाढल्यानंतर या संदर्भात अनेक तक्रारी नागपूर पोलीस विभागाला प्राप्त झाल्या. अशा वाहन चालकांविरुद्ध कारवाई करण्याचा दृष्टीकोनातून एक मोहीम सुरू करण्याचा विचारात वाहतूक पोलीस होते. या बुलेट चालकामुळे वाहतूक पोलिसांच्या या मोहिमेचा नकळत श्री गणेशा झाला.

नागपूर शहरात दुचाकी वाहनांची संख्या मोठी आहे. त्यातही महाविद्यालयात जाणाऱ्या तरुणांकडे सर्वाधिक दुचाकी आहेत. आपली गाडी इतरांच्या गाडीपेक्षा वेगळी कशी दिसेल, यावरच नागपुरातील तरुणाईचा भर आहे. वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावून शहरभर मिरविणाऱ्यांवर कारवाई होत नाही असा समज या हुल्लडबाजांचा होत आहे. वाहनांच्या क्रमांकाला भाई, आई, काका, मामा असे आकार देऊन वाहन कायदा पायदळी तुडविणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे. वाहतूक पोलीस नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर नेहमीच कारवाई करते, मात्र या बुलेटचालकावर झालेल्या बंपर कारवाईनंतर अशा प्रकारे फॅन्सी नंबरप्लेट मिरवणाऱ्यांना चांगलाच धडा मिळाला आहे.

Fancy Number Plate On Bullet

VIDEO : 

Published On - 4:45 pm, Wed, 15 January 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI