AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमधील मुथूट फायनान्स दरोड्याप्रकरणी दोघांच्या मुसक्या आवळल्या

मुथूट फायनान्स दरोडाप्रकरणात पोलिसांना पहिलं यश मिळालं आहे. पोलिसांनी दरोडा आणि गोळीबारप्रकरणी दोन संशयितांना  ताब्यात घेतलं आहे.

नाशिकमधील मुथूट फायनान्स दरोड्याप्रकरणी दोघांच्या मुसक्या आवळल्या
| Updated on: Jun 19, 2019 | 3:39 PM
Share

नाशिक : मुथूट फायनान्स दरोडाप्रकरणात पोलिसांना पहिलं यश मिळालं आहे. पोलिसांनी दरोडा आणि गोळीबारप्रकरणी दोन संशयितांना  ताब्यात घेतलं आहे. हे दोघेही उत्तर प्रदेशचे रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. पप्प्या आणि जितेंद्र सिंग अशी आरोपींची नावं आहेत.  याशिवाय पोलिस अन्य चार आरोपींचा शोध घेत आहेत.

नाशिकमध्ये 14 जून रोजी सिटी सेंटर मॉल जवळच्या मुथूट फायनान्स कार्यालयाजवळ गोळीबार झाला. चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी हा गोळीबार केला. या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या ऑडिटरचा मृत्यू झाला होता. तर वॉचमनसह तीन जण जखमी आहेत. चोरट्याने राऊंड फायर केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

नाशिकच्या उंटवाडी परिसरात मुथूट फायनान्स कंपनी आहे. यावर सकाळी सकाळीच दरोडा टाकण्यासाठी सशस्त्र दरोडेखोर आले होते. त्यांच्याकडे रिव्हॉल्वर होती. चोरट्यांना जे कोणी अडवेल, त्यांच्यावर ते फायरिंग करत होते. या फायरिंगमध्ये तीन जण जखमी झाले. यामध्ये वॉचमन आणि ऑडिटसाठी दक्षिणेकडून आलेल्या अधिकाऱ्याचा समावेश होता. या अधिकाऱ्याला गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी आणलं होतं, मात्र त्यांचा  मृत्यू झाला.

या थरारक घटनेनंतर नाशिक पोलिसांवर चहूबाजूंनी टीका झाली. नाशिक पोलिसांनी या घटनेनंतर तपासाची चक्र वेगाने फिरवली. पोलिसांनी आरोपींच्या दुचाकी मिळाल्या होत्या. आरोपी आपल्या गाड्या सोडून पळून गेले होते. अखेर पोलिसांना दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश आलं आहे. अन्य आरोपींना पकडण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

संबंधित बातम्या 

नाशिकमध्ये मुथूट फायनान्सवर दरोड्याचा प्रयत्न, गोळीबारात ऑडिटर ठार, नांगरे-पाटील घटनास्थळी   

दरोडेखोरांच्या गोळीबारात विजया बँकेच्या मॅनेजरचा मृत्यू

नाशिकमध्ये विश्वास नांगरे पाटलांना गुन्हेगारांचं थेट आव्हान?  

नाशिकमध्येही हेल्मेटसक्ती लागू, विश्वास नांगरे पाटलांचा मोठा निर्णय 

महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथक, विश्वास नांगरे पाटलांचा कौतुकास्पद निर्णय  

हेल्मेटसक्ती : 18-35 वयोगट टार्गेट, ते कर्ते पुरुष असतात : विश्वास नांगरे पाटील 

दृश्यम चित्रपट पाहून खूनाचा कट, विश्वास नांगरे पाटलांकडून पर्दाफाश

मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....