Navi Mumbai | दीड लाखांची डील, 50 हजारांचा पहिला हफ्ता, कामोठ्यात पोलीस उपनिरीक्षकाला लाच घेताना अटक

| Updated on: Aug 19, 2020 | 12:30 AM

कामोठे पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकासह एका व्यक्तीला 50 हजारांची लाच स्विकारताना अटक करण्यात आली आहे

Navi Mumbai | दीड लाखांची डील, 50 हजारांचा पहिला हफ्ता, कामोठ्यात पोलीस उपनिरीक्षकाला लाच घेताना अटक
Follow us on

नवी मुंबई : कामोठे पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकासह एका व्यक्तीला 50 हजारांची लाच स्विकारताना अटक (Sub-Inspector of Police Arrested) करण्यात आली आहे. या प्रकरणाने संपूर्ण कामोठे पोलीस ठाण्यात एकच खळबळ माजली आहे (Sub-Inspector of Police Arrested).

दिड लाखाची लाच मागून त्यातील 50 हजारांचा पहिला हफ्ता स्विकारणाऱ्या कामोठे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहित बंडगर यांना अटक करण्यात आली आहे. त्याशिवाय, एका व्यक्तीलाही ताब्यात घेण्यात आली आहे. आज दुपारी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

याप्रकरणातील तक्रारदार यांच्याविरुद्ध कामोठे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहित बंडगर (वय-30) यांच्याकडे फसवणुकीचा तक्रारी अर्ज चौकशीसाठी आला होता. त्या अर्जावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी रोहित बंडगर यांनी तक्रारदाराकडे पहिले 10 लाखांची मागणी केली होती. त्यानंतर तडजोडी अंती दिड लाखांवर त्यांचा व्यवहार ठरला.

त्यातील 50 हजारांची लाच स्विकारताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज सापळा रचून पोलीस उपनिरीक्षक रोहित बंडगर यांच्यासह एका व्यक्तीला रंगेहाथ पकडले आहे.

Sub-Inspector of Police Arrested

संबंधित बातम्या :

विवाहितेकडे लग्नाचा हट्ट, नकार दिल्याने हत्या, झाडाला लटकवून आत्महत्येचा बनाव रचणारा गजाआड

नवऱ्याची चार लग्न, तरीही पत्नीला चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, माहेरच्यांकडून हत्या