AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विवाहितेकडे लग्नाचा हट्ट, नकार दिल्याने हत्या, झाडाला लटकवून आत्महत्येचा बनाव रचणारा गजाआड

प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने प्रियकराने गळा आवळून प्रेयसीची हत्या केली (Boyfriend kill married woman Kalyan).

विवाहितेकडे लग्नाचा हट्ट, नकार दिल्याने हत्या, झाडाला लटकवून आत्महत्येचा बनाव रचणारा गजाआड
| Edited By: | Updated on: Aug 17, 2020 | 3:49 PM
Share

कल्याण : प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने प्रियकराने गळा आवळून प्रेयसीची हत्या केली (Boyfriend kill married woman Kalyan). ही धक्कादायक घटना कोणगाव कल्याण येथे घडली. दीपक रुपवते असं आरोपी प्रियकराचे नाव आहे. कल्याण गुन्हे शाखेने दीपकला अटक केली असून अधिक तपास सुरु आहे. किरण सावळे असं मृत महिलेचे नाव आहे. दीपक आणि किरण विवाहित असून दीपकची पत्नी त्याला सोडून गेली आहे (Boyfriend kill married woman Kalyan).

काहीदिवसांपूर्वी भिवंडी बायपासजवळ एका महिलेचा मृतदेह झाडावर लटकताना आढळून आला होता. प्रथम दर्शनीय या महिलेने आत्महत्या केल्याचे दिसून येत होते. या प्रकरणात कोणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला. मात्र कल्याण गुन्हे शाखेला माहिती मिळाली की मयत 24 वर्षीय महिला किरण सावळे हिने आत्महत्या केली नसून तिच्या प्रियकराने तिची हत्या केली आहे.

प्रियकराचे नाव समोर येताच कल्याण गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन, भूषण दायमा, पीएसआय नितीन मुदगुम यांच्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. अखेर मयत तरुणीचा प्रियकर दीपक रुपवते याला कोपर परिसरातून पोलिसांनी अटक केली.

दीपक आणि किरण हे दोघेही विवाहित असून दीपकची पत्नी त्याला सोडून गेली आहे. किरणने त्याच्याशी लग्न करावे असा तगादा दीपकने किरणकडे लावला होता. मात्र किरण लग्न करण्यास तयार नव्हती. काहीदिवसांपूर्वी चर्चा करण्याच्या बहाण्याने तिला भिवंडी बायपासजवळ घेऊन गेला, तिथे त्याने पुन्हा लग्नासाठी तगादा लावला मात्र किरणने नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या दीपकने किरणच्या ओढणीने तिचा गळा आवळत परत तिला लग्नाबाबत विचारले. मात्र तिने नकार देताच दीपकने किरणची हत्या केली. तिचा मृत्यू झाल्यानंतर दीपक तिकडून पळून गेला. गुन्हे शाखेने दीपकला अटक करून भिवंडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

संबंधित बातम्या :

जेसीबीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा, बीडमध्ये सासरच्यांकडून नवविवाहितेची हत्या?

साताऱ्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.