जेसीबीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा, बीडमध्ये सासरच्यांकडून नवविवाहितेची हत्या?

कौटुंबीक हिंसाचाराचं धक्कादायक प्रकरण बीड जिल्ह्यातून समोर आलंय. माहेरहून पैसे न आणल्यामुळे मुलीची हत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय.

Beed family violence case, जेसीबीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा, बीडमध्ये सासरच्यांकडून नवविवाहितेची हत्या?

बीड : जेसीबी खरेदी करण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये म्हणून वर्षभरापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेची तिच्या सासरच्या मंडळींनी हत्या केल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केलाय. या प्रकरणी आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. बीड जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील ही घटना आहे.

अमृता तांबे या मुलीचं जून 2018 मध्ये लग्न झालं होतं. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर काही दिवसातच तिचा पैशासाठी छळ करण्यात येत होता. याबाबत तिने अनेकवेळा माहेरच्या लोकांना तक्रार देखील केली. दरम्यान मंगळवारी पहाटे अमृताचा मृत्यू झाल्याची माहिती घरच्या लोकांना समजली.

अमृताचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. मात्र तिने गळफास घेतलेला नसून जेसीबीसाठी पैसे आणण्याच्या कारणावरून तिचा खून करण्यात आला. त्यामुळे तिच्या पतीसह सासरच्या मंडळींना अटक करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *