ओळखीचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; चार महिन्यानंतर नराधमाच्या मुसक्या आवळल्या

नवी मुंबईच्या घणसोली भागात रहाणाऱ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती.

ओळखीचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; चार महिन्यानंतर नराधमाच्या मुसक्या आवळल्या

नवी मुंबई : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात फरार असेलेल्या (Navi Mumbai Minor Rape) आरोपीला चार महिन्यानंतर पकडण्यात रबाळे पोलिसांना यश आलं आहे. नवी मुंबईच्या घणसोली भागात रहाणाऱ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील आरोपी सुमित प्रमोदकुमार शाह (वया -27) हा गेल्या चार महिन्यांपासून फरार होता. त्याला रबाळे पोलिसांनी बलात्कारासह पोक्सो कलमाखाली अटक केली आहे (Navi Mumbai Minor Rape).

सुमित कुमार शाह हा मुळचा बिहारमधील असून सध्या तो घणसोली भागात वडापावच्या गाडीवर काम करत होता. तर या घटनेतील पिडीत मुलगी देखील घणसोली भागात रहात होती. वर्षभरापुर्वी आरोपी सुमित शाह याने पिडीत मुलीसोबत ओळख वाढवून तिच्यासोबत शारिरीक संबध प्रस्थापित करुन पलायन केले होते.

या प्रकारानंतर पिडीत मुलगी गरोदर राहिली. तिच्या पोटात दुखू लागल्याने तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तेव्हा ती 8 महिन्यांची गरोदर असल्याचं आढळून आलं. त्यानंतर पीडितेच्या पालकांनी रबाळे पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी सुमितविरोधात चार महिन्यापूर्वी बलात्कारासह पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला होता.

तपास अधिकारी दत्तात्रय ढुमे यांनी सदर गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास करुन आरोपीचा सातत्याने शोध घेतला. 25 ऑक्टोबरला आरोपी हा घणसोली परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता, त्याने गुह्याची कबुली दिली. न्यायालयाने या आरोपीची 2 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

Navi Mumbai Minor Rape

संबंधित बातम्या :

लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार, पोलीस उपनिरीक्षकावर बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा

नवरात्रीत सोनसाखळी चोरण्यासाठी दिल्लीहून मुंबईत; पोलिसांनी आवळल्या दोघांच्या मुसक्या