Drugs Connection |ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी ‘वेलकम’चे निर्माते फिरोज नाडियादवाला यांच्या पत्नीला अटक; आणखी दोघे जेरबंद

भीमराव गवळी, Tv9 मराठी

Updated on: Nov 08, 2020 | 8:40 PM

एनसीबीने आज 'वेलकम'चे निर्माते फिरोज नाडियादवाला यांच्या घरी आणि कार्यालयात छापा मारला आहे. या धाडीत एनसीबीला ड्रग्ज सापडलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (NCB conducts raids at Firoz Nadiadwala's Mumbai home)

Drugs Connection |ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी ‘वेलकम’चे निर्माते फिरोज नाडियादवाला यांच्या पत्नीला अटक; आणखी दोघे जेरबंद

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणानंतर बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन उघड झाल्यानंतर एनसीबीने ठिकठिकाणी धाडी मारण्यास सुरुवात केली आहे. एनसीबीने आज ‘वेलकम’, ‘फिर हेरा फेरी’, ‘आवारा पागल दीवाना’, ‘आन: मॅन अॅट वर्क’, ‘फूल अँड फायनल’ आदी सिनेमांचे निर्माते फिरोज नाडियादवाला यांच्या घरी आणि कार्यालयात छापा मारला असून या प्रकरणी त्यांची पत्नी शबाना सईद यांना अटक केली आहे. (NCB conducts raids at Firoz Nadiadwala’s Mumbai home)

आज सकाळपासूनच एनसीबीने काही ठिकाणी धाडी मारली आहे. मुंबईत मालाड, अंधेरी, लोखंडवाला, खारघर, कोपरखैरनेसह काही भागात ड्रग्ज पेडलर्सच्या अड्डयांवर एनसीबीने आज छापे मारले. यावेळी एनसीबीने चार ड्रग्ज पेडलर्सना अटक केली आहे. एनसीबीने आज ताब्यात घेतलेल्या या चौघांकडून 717 ग्रॅम गांजा, 74.1 ग्रॅम चरस आणि 95.1 ग्रॅम एमडी जप्त केला आहे. त्यातील एका ड्रग्ज पेडलर्सची कसून चौकशी केली असता त्याने फिरोज नाडियादवाला यांचं नाव घेतल्याने त्यांच्याही घरी आणि कार्यालयात धाड मारण्यात आली.

यावेळी नाडियादवाला यांच्या घरातून ड्रग्ज जप्त केलं असून नाडियादवाला यांच्या पत्नी शबाना सईद यांची कसून चौकशी करून अखेर त्यांना अटक केली आहे. या शिवाय घरातील दोन साक्षीदारांनाही ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर एनसीबीने नाडियादवाला यांनाही समन्स पाठवलं असून त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड ग्रॅबिएला डेमोट्रियड्सच्या भावाला अटक करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर त्याला काही अटींवर जामीन देण्यात आला होता. मात्र, त्याला पुन्हा अटक करण्यात आली आहे.

करिश्मा प्रकाशचीही झाली होती चौकशी

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची माजी मॅनेजर करिश्मा प्रकाशची ड्रग्ज प्रकरणी (Drugs Connection) एनसीबीकडून चौकशी करण्यात आली होती. इतके दिवस सगळ्यांपासून लपण्याचा प्रयत्न करणारी करिश्मा (Karishma Prakash) अखेर एनसीबीसमोर हजर झाली होती. मागील काही दिवसांपासून एनसीबी करिश्माला चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात समन्स बजावत आले होते. करिश्मा प्रकाश दीपिका पादुकोणची मॅनेजर होती. ती क्वान कंपनीच्या वतीने दीपिकाचे काम सांभाळत होती. एनसीबीने अलीकडेच तिच्या घरावर छापा टाकून ड्रग्ज जप्त केले होते. त्यानंतर ती पुन्हा एकदा एनसीबीच्या रडारवर आली.

संबंधित बातम्या:

Drugs Connection | ‘फरार’ करिश्मा एनसीबीसमोर हजर, ड्रग्ज प्रकरणी चौकशीला सुरुवात!

Kshitij Prasad | क्षितीज प्रसादवर कोकेन प्रकरणात नवा गुन्हा

(NCB conducts raids at Firoz Nadiadwala’s Mumbai home)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI