‘प्रवीण दरेकर आणि राधाकृष्ण विखे यांना काय चॉकलेट देऊन आणलं का?’

एकदा चंद्रकांतदादा पाटलांचा फोन आला होता. पण, त्यांना माझी गरज वाटली नाही त्यामुळे त्यांनी फार आग्रह केला नाही.' अशा शब्दात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गौप्यस्फोट केला आहे.

'प्रवीण दरेकर आणि राधाकृष्ण विखे यांना काय चॉकलेट देऊन आणलं का?'
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Oct 24, 2020 | 1:31 PM

मुंबई : ‘मी जाणार हे गोपीनाथ गडावरच स्पष्ट झालं होतं. त्यावेळी मला थांबवण्यासाठी का आग्रह केला नाही? मला थांबण्यासाठी कुणाचा फोन आला नाही. एकदा चंद्रकांतदादा पाटलांचा फोन आला होता. पण, त्यांना माझी गरज वाटली नाही त्यामुळे त्यांनी फार आग्रह केला नाही.’ अशा शब्दात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ खडसेंनी हाती घड्याळ बांधल्यानंतर आता सत्ताधारी आणि विरोधी भाजप असा वाद रंगल्याचं पाहायला मिळतं. खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आज पुन्हा एकदा भाजपवर टीका केली आहे. (NCP Eknath Khadse Criticized On Chandrakant Patil)

खडसेंना राष्ट्रवादीमध्ये लिमलेटची गोळी मिळते की कॅटबरी चॉकलेट मिळतं हे आम्हाला पण पाहायचं आहे अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्यावर खडसेंनी चोख प्रत्यूत्तर दिलं आहे. ‘भाजपामध्ये मोठ्या संख्येनं लोक आलेत. प्रवीण दरेकर आणि राधाकृष्ण विखे यांना काय चॉकलेट देऊन आणलं आहे का? असा थेट सवाल खडसेंनी विचारला आहे.

रात गयी, बात गयी, खडसेंबाबतच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांची कमेंट

ते पुढे म्हणाले की, ‘अजित पवारांविरोधात गाडीभर पुरावे जे गाडीभर नव्हतेच ते घेवून ज्यावेळी भाजपाच्या नेत्यांनी मोर्चा काढला त्यावेळी मी मोर्चात नव्हतो. देवेंद्र फडणीसांनी पहाटे अजितदादांसोबत शपथ घेतली त्यानंतर लगेच त्यांना क्लिनचीट दिली आणि आता तेच लोक आरोप करत’ असल्याची टीकाही यावेळी खडसेंनी केली.

‘माझ्यासोबत निवडून आलेले किती लोक येत आहेत हे महत्वाचे नाही, किती लोक निवडून आणू शकतो हे महत्वाचे आहे. सध्यातरी माझ्यासोबत पदावर असलेले कुठले आमदार, खासदार पक्षात येणार नाहीत. मात्र 10-12 माजी आमदार राष्ट्रवादीचे काम करतील’ असंही यावेळी खडसेंनी सांगितलं.

मुंबईत सेक्स रॅकेट उद्ध्वस्त, बॉलिवूड अभिनेत्रीसह तिघांना अटक

(NCP Eknath Khadse Criticized On Chandrakant Patil)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें