Neha Kakkar | रोहनप्रीतशी लग्नानंतर नेहाने नाव बदलले, सोशल मीडियावरील नवे नाव चर्चेत!

प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर हिचे नुकतेच लग्न झाले आहे. रोहनप्रीत सिंह सोबत नेहा कक्करने तिच्या वैवाहिक आयुष्याची सुरूवात केली आहे.

Neha Kakkar | रोहनप्रीतशी लग्नानंतर नेहाने नाव बदलले, सोशल मीडियावरील नवे नाव चर्चेत!
नेहा आणि रोहनप्रीतनं दिल्लीतील गुरुद्वारात पंजाबी पद्धतीनं लग्न केलं.
Follow us
| Updated on: Oct 30, 2020 | 12:59 PM

मुंबई : प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर हिचे नुकतेच लग्न झाले आहे. रोहनप्रीत सिंह सोबत नेहा कक्करने तिच्या वैवाहिक आयुष्याची सुरूवात केली आहे. सर्वसामान्य वधूंप्रमाणेच नेहा कक्करने लग्नानंतर तिच्या नावामध्ये बदल देखील केला आहे.  महिला लग्न झाल्यानंतर आपल्या नावासोबत पतीचे नाव लावतात. नेहाने देखील रोहनप्रीतचे नाव तिच्या नावासोबत जोडले आहे. नेहाने तिचे नवीन नाव सोशल मीडियावरील प्रोफाइलला ठेवले आहे. म्हणजेच, नेहा कक्करने तिच्या नावासोबतच मिसेस सिंग लावले आहे. (Neha kakkar Got married to Rohanpreet Neha changed name is social media)

नेहा कक्कर नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. तिने पंजाबी गायक रोहनप्रीत सिंहसोबत पंजाबी पद्धतीनं गुरुद्वारात लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लग्नाच्या गुलाबी रंगाच्या पोशाखात दोघेही अत्यंत देखणे दिसत होते. गेले अनेक दिवस दोघांच्या लग्नाची चर्चा होती, अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते. मात्र नेहानं चाहत्यांसाठी लग्नाचं सरप्राईजच ठेवलं होतं. नुकत्याच रिलीज झालेल्या ‘नेहु दा ब्याह’ या गाण्यामुळे तिच्या लग्नाची चर्चा अजूनच रंगली होती. या गाण्यात नेहासोबत गायक रोहनप्रीतही झळकला होता. या गाण्यात नेहा आणि रोहनप्रीतचे लग्न दाखवण्यात आले होते. त्यामुळे तिचे चाहते पुन्हा एकदा बुचकळ्यात पडले होते. गाण्यात नेहाचे लग्न दाखवल्याने ती खरंच लग्न करतेय की केवळ गाण्यासाठी हा सगळा ड्रामा करतेय, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता.मात्र खुद्द नेहानं लग्नाच्या फंक्शनचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यास सुरुवात केल्यानंतर तिच्या चाहत्यांना यावर विश्वास बसला . कोण आहे रोहनप्रीत सिंग? रोहनप्रीत सिंग ‘रायझिंग स्टार’ या गायन रियलिटी शोमध्ये पहिला रनरअप होता. तो बिग बॉस फेम शहनाज गिल या टीव्ही रिअ‍ॅलिटी शो ‘मुझसे शादी करोगे’ मध्येही चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता. रोहनच्या आवाजाने त्याने अनेकांच्या मनात जागा मिळवली आहे. खरंतर, शहनाजसुद्धा रोहनला आवडत होती. पण रोहनने नेहासोबत लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या हे दोघेही इंस्टाग्रामवर प्रेमाची कबूली देत अनेक पोस्ट शेअर करत आहेत.

संबंधित बातम्या : 

Neha Kakkar Wedding : वेडिंग ड्रेसची कॉपी?, नेहा कक्कर ट्रोल; सोशल मीडियावर मीम्स

Neha Kakkar | गायिका नेहा कक्कर लग्नबंधनात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

(Neha kakkar Got married to Rohanpreet Neha changed name is social media)

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.