रात्री मॉडेलिंग, दिवसा घरफोड्या, नेपाळी अभिनेत्याला मुंबईत अटक

| Updated on: Oct 11, 2019 | 7:59 PM

मॉडेलिंगचा शॉक असणारा, मोठमोठ्या इव्हेंट शोमध्ये काम करणाऱ्या एका चोराला क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी (Nepali actor arrested) अटक केली आहे.

रात्री मॉडेलिंग, दिवसा घरफोड्या, नेपाळी अभिनेत्याला मुंबईत अटक
Follow us on

मुंबई : मॉडेलिंगचा शॉक असणारा, मोठमोठ्या इव्हेंट शोमध्ये काम करणाऱ्या एका चोराला क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी (Nepali actor arrested) अटक केली आहे. राहुल रामसिंग थापा असं या चोराचं नाव (Nepali actor arrested) आहे. तो मूळ नेपाळचा आहे. राहुल थापा याच्या नावे घरफोडीच्या 50 गुन्ह्यांची नोंद असल्याची धक्कादायक माहिती (Nepali actor arrested) समोर आली आहे.

राहुल थापा हा नेहमी मॉडेलसारखा रहायचा. तो अनेक मोठमोठ्या इव्हेंटमध्ये कलाकार म्हणून काम करायचा. तो दिवसा घरफोडी करायचा आणि रात्री इव्हेंटमध्ये काम करायचा. त्याच्याकडे स्वत:ची गाडी आणि दुचाकी आहे. याद्वारे तो भर दुपारी आपल्या गाडीतून टेहळणी करायला जायचा. त्यावेळी एखाद्या इमारतीजवळ वयस्कर वॉचमन शोधायचा. त्याच्याशी गप्पा मारुन इमारतीची माहिती घ्यायचा. मग घरफोडी करुन चोरी करायचा.

राहुल थापा हा 2007 मध्ये मुंबईत आला. सुरुवातीला तो पवईमध्ये राहत होता. मग तो तिथेच चोरी करु लागला. पवईमध्ये 2007 ते 2008 या काळात त्याने 20 घरफोडी केल्या. यानंतर त्याला अटक झाली. काही वर्ष तो जेलमध्ये होता. त्यानंतर 2011 मध्ये तो जामिनावर सुटला. त्याने आपलं राहण्याचे ठिकाण बदलून त्याने पुन्हा घरफोडी करण्यास सुरुवात केली. ठाणे, नवी मुंबई, उरण, उल्हासनगर या ठिकाणी त्याने घरफोडीचे सत्र सुरु केलं.

काही दिवसांपूर्वी राहुल हा ऐरोली येथे येणार असल्याची माहिती मुंबई क्राईम ब्राँचच्या युनिट तीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक खोत यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा लावून राहुल थापा याला अटक केली. त्याच्यावर असलेल्या 30 च्या वर गुन्हे असल्याची कबुली राहुलने दिली.