मुंबई : ऑटोमोबाईल क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या Hyundai India ची प्रिमियम हॅचबॅक ‘ऑल-न्यू’ आय 20 (all new i20) ही कार 06 नोव्हेंबर रोजी लाँच करण्यात आली. तर लाँचिंगपूर्वीच 28 ऑक्टोबरपासून या कारच्या बुकींगला सुरुवात करण्यात आली आहे. ही कार भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. बुकिंगला सुरुवात केल्यानंतर अवघ्या 20 दिवसांमध्ये या कारच्या 20 हजार युनिट्सची रेकॉर्डब्रेक बुकिंग करण्यात आली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी आतापर्यंत 4000 युनिट्सची डिलीव्हरीदेखील केली आहे. (New hyundai i20 bookings crossed to 20 thousand units in just 20 days, check ist price and specs)