Crash Test : टाटा नेक्सॉन, ह्युंदाई वेन्यू ते ईकोस्पोर्ट, ‘या’ पाच सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही सुरक्षित आहेत का?

जगभरात अशा अनेक कंपन्या आहेत ज्या वाहनं बनवताना केवळ तिच्या लुक्स आणि फिचर्सचाच विचर न करता कारच्या सुरक्षिततेचाही खूप विचार करतात. भारतात गेल्या काही वर्षांपासून महिंद्रा आणि टाटा या दोन कंपन्या त्यांच्या कार्सच्या सुरक्षिततेकडे अधिक लक्ष देत असल्याचे निदर्शनास आले आहे.

Crash Test : टाटा नेक्सॉन, ह्युंदाई वेन्यू ते ईकोस्पोर्ट, 'या' पाच सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही सुरक्षित आहेत का?
Follow us
| Updated on: Nov 21, 2020 | 3:16 PM

मुंबई : भारतीय ग्राहक गेल्या काही वर्षांपासून गाडी खरेदी करताना आपल्या आणि वाहनाच्या सुरक्षिततेचा (Car Safety) अधिक विचार करत आहेत. प्रत्येक ग्राहक त्याची ड्रिम कार किती सुरक्षित आहे, याचा विचार हमखास करतो. जगभरात अशा अनेक कंपन्या आहेत ज्या वाहनं बनवताना केवळ तिच्या लुक्स आणि फिचर्सचाच विचर न करता कारच्या सुरक्षिततेचाही खूप विचार करतात. तर काही कंपन्या अशाही आहेत ज्यांच्या कार बाहेरुन दमदार दिसतात, परंतु मजबुती आणि सुरक्षिततेच्या बाबतीत मागे पडतात. (Compact SUV Crash Test Ratings of Tata Nexon, Hyundai Venue, Ford Ecosport, Mahindra XUV300 and Kia Sonet)

सब- 4 मीटर SUV भारतात सर्वात जास्त प्रसिद्ध आहेत, कारण या सेगमेंटमधील गाड्या सर्वात सुरक्षित मानल्या जातात. ग्बोबल NCAP (New Car Assessment Programme) च्या रिपोर्टनुसार या गाड्या सुरक्षेसह फिचर्स आणि इंटिरियर स्पेसच्या बाबतीतही दमदार आहेत. त्यामुळे या सेगमेंटमध्ये तुम्हाला किफायतशीर गाड्या अधिक मिळतील आणि त्या सुरक्षितही असतील.

महिंद्रा XUV300 (Mahindra XUV300)

महिंद्रा XUV300 ही भारतातील सर्वात सुरक्षित मेड इन इंडिया कार आहे. या कारला ग्बोबल NCAP ने 5 स्टार रेटिंग दिलं आहे. या कारला मुलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत 3 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. भारतात तयार करण्यात आलेली ही कार दमदार आहेच, तितकीच सुरक्षितही आहे. तसेच या कारमध्ये जबरदस्त फिचर्सही देण्यात आले आहेत. सुरक्षिततेसाठी या कारमध्ये 7 एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत.

टाटा नेक्सॉन (Tata Nexon)

टाटाची ही छोटी क्रॉसओव्हर गाडी भारतातील पहिली अशी कार आहे. जिला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. नेक्सॉनला मुलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत 3 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. टाटा मोटर्स कंपनी त्यांची प्रत्येक कार मजबूत कशी होईल, याकडे सर्वाधिक लक्ष देते. तसेच टाटाच्या टियागो आणि टिगॉरला क्रॅश टेस्टमध्ये 4 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे.

फोर्ड इकोस्पोर्ट (Ford EcoSport)

ही अशी कार आहे जिची ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये चाचणी घेण्यात आलेली नाही. परंतु 2013 मध्ये या कारच्या युरो स्पेक मॉडेलची क्रॅश टेस्ट घेण्यात आली होती, तेव्हा या कारला 4 स्टार रेटिंग देण्यात आलं. तसेच 2018 मध्ये नॅशनल हायवे ट्राफिक सेफ्टी अॅडमिनिस्ट्रेशन, अमेरिकाने या कारला सुरक्षिततेच्या बाबतीत 4 स्टार रेटिंग दिलं आहे.

ह्युंदाई वेन्यू (Hyundai Venue)

या कारचीदेखील क्रॅश टेस्ट घेण्यात आलेली नाही. या कारच्या अमेरिकन स्पेक व्हर्जनची क्रॅश टेस्ट झाली आहे. त्यात या गाडीला सुरक्षिततेच्या बाबतीत प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. अमेरिकेच्या IIHS अनुसार या कारला टॉफ सेफ्टी पिकचा पुरस्कार देण्यात आला आहे. तर या कारच्या ऑस्ट्रेलियन स्पेक मॉडेलला 4 स्टार रेटिंग मिळालं आहे.

किया सोनेट (Kia Sonet)

किया सोनेट ही कार एक महिन्यापूर्वी लाँच करण्यात आली आहे. या कारची अद्याप क्रॅश टेस्ट झालेली नाही. मात्र ही कार ह्युंदाई वेन्यूच्या (Hyundai Venue) धर्तीवर डिझाईन करण्यात आली आहे. तसेच या कारमध्ये अनेक सेफ्टी फिचर्स देण्यात आले आहेत. तसेच किया मोटर्स कंपनीच्या आतापर्यंतच्या अनेक कार्सना क्रॅश टेस्टमध्ये तीन किंवा त्याहून अधिक रेटिंग मिळालं आहे.

संबंधित बातम्या

Crash Test : क्रॅश टेस्टमध्ये मारुती, टाटा आणि महिंद्राच्या ‘मेड इन इंडिया कार’ पास की नापास?

तुमच्याकडे मारुती सुझुकीची ‘ही’ कार असल्यास सावध व्हा; क्रॅश टेस्टमध्ये नापास

Kia Motors च्या ‘या’ कारमध्ये आढळला दोष; कंपनीने सर्व गाड्या परत मागवल्या

(Compact SUV Crash Test Ratings of Tata Nexon, Hyundai Venue, Ford Ecosport, Mahindra XUV300 and Kia Sonet)

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.