कट रचून आनंद दिघेंचा मृत्यू दाखवला, बाळासाहेबांवर निलेश राणेंचा स्फोटक आरोप

रत्नागिरी: महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी स्फोटक वक्तव्य केलं. निलेश राणे यांनी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी केलेल्या कथित खुनांचा पाढा वाचला. इतकंच नाही तर शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत कट रचून त्यांचा मृत्यू रुग्णालयात दाखवण्यात आला. तसंच याबाबत ज्या दोन शिवसैनिकांना माहिती होती, त्यांचाही […]

कट रचून आनंद दिघेंचा मृत्यू दाखवला, बाळासाहेबांवर निलेश राणेंचा स्फोटक आरोप
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

रत्नागिरी: महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी स्फोटक वक्तव्य केलं. निलेश राणे यांनी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी केलेल्या कथित खुनांचा पाढा वाचला. इतकंच नाही तर शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत कट रचून त्यांचा मृत्यू रुग्णालयात दाखवण्यात आला. तसंच याबाबत ज्या दोन शिवसैनिकांना माहिती होती, त्यांचाही बाळासाहेबांच्या सांगण्यावरुन खून करण्यात आला, असं स्फोटक वक्तव्य निलेश राणे यांनी केलं. ते रत्नागिरीत बोलत होते. काही दिवसांपूर्वीच शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंच्या 10 वर्षांच्या कारकीर्दीत कोकणात 9 खून पडल्याचा आरोप केला होता. त्यावरुन निलेश राणे यांनी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आरोप केले.

निलेश राणे यांचे आरोप जसेच्या तसे, त्यांच्याच शब्दात

“आम्ही आजपर्यंत एक मर्यादा पाळली. राणे साहेबांनीही पाळली. आम्ही कधी बाळासाहेबांबद्दल बोललो नाही. बाळासाहेबांनी काय काय केलंय, त्याबद्दल कधी बोललो नाही. कारण आम्हाला आमची मर्यादा माहित होती. आणि आमचे राणेसाहेब बाळासाहेबांवर आजही एवढे प्रेम करतात, की त्यांना ते कधी सांगता आलं नाही. पण एक मुलगा म्हणून, मी त्यांना साहेब जरी म्हणत असलो, तरी ते आधी माझे वडील आहेत. त्यांचा जाहीर कार्यक्रमात कुणी अपमान करत असेल, तर बाळासाहेबांची खरी परिस्थिती मला सांगावी लागेल.

आनंद दिघेंचं खरं काय झालं? कट कसा रचला गेला आणि त्यांचं मरण हे हॉस्पिटलमध्ये दाखवण्यात आलं. आणि हे दोन शिवसैनिकांना सहन झालं नाही. त्या शिवसैनिकांना ठार मारायाचा बाळासाहेबांनी कुणाला आदेश दिला आणि ते ठार झाले सुद्धा. ती केस दाबली गेली. जे दिघेसाहेबांबद्दल झालं, ते चुकीचं वाटलं शिवसैनिकांना म्हणून बाळासाहेबांच्या सांगण्यावरुन त्या दोघांना ठार मारलं गेलं.

मी आजपर्यंत मर्यादा ठेवल्या, मात्र राणेसाहेबांबद्दल जर कुणी खालच्या दर्जाचा माणूस खालच्या पातळीची टीका करत असेल, तर मी सहन करणार नाही. माझ्यासाठी राणेसाहेब महत्त्वाचे आहेत, बाळासाहेब माझ्यासाठी महत्त्वाचे नाहीत. जेवढी मर्यादा आम्ही ठेवली होती, ती विनायक राऊतांनी त्या व्यासपीठावर ठेवली नाही.

त्याच्यानंतर सोनू निगमला ठार मारायचं होतं बाळासाहेबांना. अनेकवेळा सोनू निगमला ठार मारायचे प्रयत्न झाले. तुम्ही त्यांना (सोनू निगम) विचारा, आज ते सांगतीलही. घाबरले असतील, मात्र, आज बाळासाहेब नाहीत, तर सांगतीलही. बाळासाहेबांच्या सांगण्यावरुन कुठे कुठे सोनू निगमला ठार मारायला शिवसैनिक गेले होते. काय नातं होतं सोनू निगमचं आणि ठाकरे घराण्याचं, हे मला सांगायला लावू नका. जर माझं तोंड उघडायला लावाल, जाहीर सभेमध्ये सांगेन.

बाळासाहेबांच्या कर्जतच्या फार्म हाऊसवर कुणा-कुणाचे मृत्यू झाले? कोण कोण गेलं कर्जतच्या फार्म हाऊसवर? हे सगळं जाहीर सभेमध्ये सांगेन. आमच्या नादाला लागायचं नाही. राणे म्हणतात आम्हाला. आजपर्यंत राणेसाहेब कधीही बोलले नाहीत. बाळासाहेबांनी केलं, त्यांचा मानसन्मान ठेवलाच पाहिजे. पण आमच्या राणेसाहेबांचा मानसन्मान कुणी ठेवायचा? बाळासाहेब बोलत होते, ते आम्हाला चालत होतं. आम्हाला काही फरक पडत नव्हता. पण असे गल्लीबोळातले गटरछाप (विनायक राऊत) बोलायला लागले, तर आम्ही गप्प बसायचं?

कोण होते आनंद दिघे?

आनंद चिंतामणी दिघे हे ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे धडाडीचे नेते होते. ‘धर्मवीर आनंद दिघे’ असे त्यांना संबोधले जाई. ठाणे जिल्ह्यावर आनंद दिघेंचं एकहाती वर्चस्व होते.

26 ऑगस्ट 2001 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने आनंद दिघे यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाचा धक्का पचवता न आलेल्या कार्यकर्त्यांनी सुलोचनादेवी सिंघानिया हॉस्पिटल पेटवलं होतं. याच हॉस्पिटलमध्ये आनंद दिघे यांचं निधन झालं होतं.

आनंद दिघे यांच्यावर शिवसेना नेते श्रीधर खोपकर यांच्या हत्येचा आरोप होता. खोपकर यांनी 1989 साली काँग्रेसला मतदान केल्याचं बोललं जात होतं. दिघे यांना त्यावेळी टाडाअंतर्गत अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर जामिनावर सोडण्यात आलं. दिघे यांच्या निधनापर्यंत त्यांच्यावरील खटला सुरुच होता.

VIDEO:

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.