हाफ शर्ट, लुंगी बनियान घालून कार चालवल्यास दंड? नितीन गडकरी म्हणतात

हाफ शर्ट किंवा लुंगी बनियान घालून कार चालवल्यास दंड आकारला जाणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरत आहेत. मात्र नितीन गडकरींनी ट्वीट करुन अशा अफवांपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

हाफ शर्ट, लुंगी बनियान घालून कार चालवल्यास दंड? नितीन गडकरी म्हणतात
Follow us
| Updated on: Sep 26, 2019 | 3:08 PM

मुंबई : नवीन मोटार वाहन कायदा लागू झाल्यानंतर वाहनचालकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. सोशल मीडियावर वेगवेगळ्या अफवा पसरत असल्यामुळे नेमके कोणते नवे नियम आहेत आणि कोणते नियम मोडल्यावर दंडाची तरतूद आहे, याविषयी गोंधळ आहे. मात्र आता खुद्द केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी ट्वीट करुन संभ्रम दूर (Nitin Gadkari Explains Motor Vehicle Act) केला आहे.

हाफ शर्ट किंवा लुंगी बनियान घालून कार चालवल्यास पावती फाडली जाणार असल्याचं सोशल मीडियावर म्हटलं जात आहे. मात्र गडकरींनी ट्वीट करुन अशा अफवांपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

‘ऑफिस ऑफ नितीन गडकरी’ या ट्विटर हँडलवरुन ‘नवीन मोटार वाहन कायद्या’तील नवीन तरतुदींविषयी माहिती (Nitin Gadkari Explains Motor Vehicle Act) देण्यात आली आहे.

खालील गोष्टी केल्या, तरीही दंडाची तरतूद नाही

1. अर्ध्या बाहीचे शर्ट (हाफ शर्ट) घालून कार चालवणे 2. लुंगी बनियानमध्ये गाडी चालवणे 3. गाडीमध्ये एक्स्ट्रा बल्ब नसणे 4. कारच्या काचा अस्वच्छ असणे 5. चप्पल घालून कार चालवणे

‘रस्ते सुरक्षा कायद्यासारख्या गंभीर विषयांची मीडियामधील मित्र खिल्ली उडवत असल्याचा मला खेद आहे. लोकांच्या जीवनाशी निगडीत गंभीर विषयांवर चुकीची माहिती पसरवून भ्रम पसरवू नये, असं सर्वांना आवाहन आहे.’ असं नितीन गडकरी याआधी म्हणाले होते.

नवीन मोटार वाहन कायदा एक सप्टेंबरपासून लागू झाला. वाहतुकीशी संबंधित नियमांचं उल्लंघन केल्यास मोठ्या प्रमाणावर दंडाची तरतूद आहे. आधीच्या कायद्यातील नियमांच्या तुलनेत दंडाची रक्कम दहापटींनी वाढवण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्य वाहनचालकांनी याविषयी नाराजी व्यक्त केली होती.

देशात रस्ते अपघातांमध्ये बळी पडणाऱ्या प्रवाशांचा आकडा मोठा आहे. जोपर्यंत भरभक्कम दंड आकारण्याची तरतूद केली जात नाही, तोपर्यंत वाहनचालकांना जरब बसणार नाही. दंडवसुलीच्या धाकाने का असेना, वाहतुकीचे नियम मोडण्यासारखे गंभीर प्रकार थांबतील, असं गडकरींचं मत आहे. महाराष्ट्रातून दंडाच्या रकमेबाबत पुनर्विचार करण्याची मागणी केंद्राकडे करण्यात आली आहे.

वाहतुकीचे नियम कठोर

ड्रायव्हिंग लायसन्स सोबत नसेल तर पाचशे रुपयांऐवजी दसपट म्हणजे तब्बल पाच हजार रुपये दंड मोजावा लागणार आहे. दारु पिऊन गाडी चालवणाऱ्या चालकांकडून दोन हजार रुपये दंड वसूल केला जात होता, तोही आता दहा हजार रुपयांवर नेण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलांनी गाडी चालवताना अपघात घडला, तर त्याच्या किंवा तिच्या पालकांना तीन वर्ष तुरुंगवासाची तरतूद आहे. त्याचबरोबर त्या वाहनाची नोंदणीही रद्द करण्यात येईल.

लायसन्सशिवाय गाडी चालवल्यास दहापट दंड, एक सप्टेंबरपासून वाहतुकीचे 17 नियम अधिक कडक

रुग्णवाहिका, अग्निशमन दल यासारख्या आपत्कालीन वाहनांना रस्ता दिला नाही, किंवा पात्र नसतानाही गाडी चालवली, तर दहा हजार रुपये दंड होऊ शकतो. भरधाव वेगाने गाडी चालवल्यास एक ते दोन हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.

नव्या नियमांवर एक नजर

1. विनातिकीट प्रवास केल्यास पाचशे रुपये दंड

2. अधिकाऱ्यांचा आदेश न मानल्यास दोन हजार रुपये दंड

3. ड्रायव्हिंग लायसन्स नसताना गाडी चालवल्यास पाच हजार रुपये दंड

4. अपात्र असताना वाहन चालवल्यास दहा हजार रुपये दंड

5. भरधाव वेगाने गाडी चालवल्यास एक हजार रुपये दंड

6. धोकादायक पद्धतीने वाहन चालवल्यास पाच हजार रुपये दंड

7. दारु पिऊन गाडी चालवल्यास दहा हजार रुपये दंड

8. ओव्हरस्पीड किंवा रेसिंग केल्यास पाच हजार रुपये दंड

9. वाहन परवान्याचे नियम तोडल्यास 25 हजारांपासून एक लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

10. वाहनात अतिरिक्त सामान भरल्यास दोन हजार रुपयांहून जास्त दंड

11. वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यास प्रत्येकामागे एक हजार रुपये दंड

12. सीटबेल्ट न लावल्यास एक हजार रुपये दंड

13. स्कूटर किंवा बाईकवर दोनपेक्षा जास्त व्यक्ती बसल्यास दोन हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांसाठी लायसन्स रद्द

14. हेल्मेट न घातल्यास एक हजार रुपये दंड आणि 3 महिन्यांसाठी लायसन्स रद्द

15. अँब्युलन्स, अग्निशमन दल यासारख्या आपत्कालीन वाहनांना रस्ता न दिल्यास दहा हजार रुपये दंड

16. इन्शुरन्स नसलेलं वाहन चालवल्यास दोन हजार रुपये दंड

17. अल्पवयीन पाल्याने गाडी चालवताना अपघात झाल्यास पालकांना तीन वर्ष तुरुंगवास आणि वाहनाची नोंदणीही रद्द

Non Stop LIVE Update
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.