मराठा आरक्षणाचा पेच सोडवण्यात ओबीसी समाज सहकार्य करेल, संभाजीराजेंना ओबीसी नेत्यांचा शब्द

खासदार हरीभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली ओबीसीच्या शिष्टमंडळाने छत्रपती संभाजीराजेंची भेट घेतली. (OBC leaders Meet MP Chhatrapati Sambhaji Raje)

मराठा आरक्षणाचा पेच सोडवण्यात ओबीसी समाज सहकार्य करेल, संभाजीराजेंना ओबीसी नेत्यांचा शब्द
Follow us
| Updated on: Sep 29, 2020 | 1:24 PM

मुंबई : “ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका घेतली याचा मला आनंद झाला आहे. मराठा आरक्षणाचा पेच सोडवण्यात ओबीसी समाज सहकार्य करेल,” असा शब्द ओबीसी समाजातील नेत्यांनी खासदार छत्रपती संभाजीराजे यांना दिला. मराठा आणि ओबीसी समाजातील संघर्ष वाढू नये यासाठी माजी खासदार हरीभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली ओबीसीच्या शिष्टमंडळाने छत्रपती संभाजीराजेंची भेट घेतली. या भेटीनंतर संभाजीराजेंनी याबाबतची प्रतिक्रिया दिली. (OBC leaders Meet MP Chhatrapati Sambhaji Raje On Maratha And OBC Reservation Issue)

“छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यांना सोबत घेतले. शाहू महाराजांनी बहुजनांना आरक्षण दिले. माझी पहिल्या दिवशी पासून हीच भूमिका आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न हा इतर समाजाला विश्वासात घेऊन सोडवला जावा अशी माझी सुरुवातीपासूनची भूमिका आहे. आज ओबीसी समाजाचे नेते माझ्याकडे भेटायला आले होते. त्यांनी मराठा आरक्षणाचा पेच सोडवण्यात सहकार्य करण्याची भूमिका घेण्याचा शब्द दिला. ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात जी भूमिका घेतली त्याचा मला आनंद आहे,” असे संभाजीराजे म्हणाले.

“ओबीसी आणि मराठा समाजातील लोकांनी एकत्र येत यावर मार्ग कसा काढता येईल, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावा. तसेच सकल मराठा समाजाच्या लोकांसोबत मी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री अशोक चव्हाण यांना भेटणार आहे. त्यावेळी ओबीसी समाजातील लोकांना सोबत घेऊन मार्ग काढण्याबाबत मार्ग सुचवणार आहे,” असेही संभाजीराजेंनी सांगितले.

“मराठा समाजात दुफळी निर्माण होत आहे”

“‘ठोकून काढा’ या वक्तव्यातून मला सगळ्यांना एकसंघ राहा असं सांगायचे होते. कोण इकडे जातयं, कोण तिकडं जातयं, मराठा समाजात फूट पाडू नका हे सांगायचे होते. मराठा समाजात दुफळी निर्माण होत आहे हे मान्य केले पाहिजे. आर्थिक निकषावर आरक्षण देता येत नाही हे आधी स्पष्ट झाले होते, त्यामुळे त्या मार्गावर का जायचं?” असा प्रश्नही संभाजीराजेंनी उपस्थितीत केला आहे. (OBC leaders Meet MP Chhatrapati Sambhaji Raje On Maratha And OBC Reservation Issue)

संबंधित बातम्या :

मराठा आरक्षणाच्या लढ्याचे नेतृत्व छत्रपती संभाजीराजेंनी करावं, शिवसेना खासदाराची मागणी

मराठा आंदोलकांना नोटिसा पाठवू नयेत, छत्रपती संभाजीराजे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.